जालना / बीड: राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या मदतीवरून मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर अत्यंत कडाडून हल्ला चढवला आहे. दुष्काळाने आणि अतिवृष्टीने पूर्णपणे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मलमपट्टी करण्याचा नव्हे तर त्यांच्या दुःखाची थट्टा करण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे यांनी केली आहे.
अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यात दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, पिके वाया गेली आहेत आणि अन्नदात्याच्या पुढ्यात जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने हेक्टरी किमान १ लाख रुपयांचे आर्थिक अनुदान देण्याची खरी गरज असताना, केवळ ५ हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. "फक्त पाच हजारांच्या अनुदानासाठी आता शेतकऱ्यांना बँकेच्या दारात आणि रांगांमध्ये तासन् तास उभे राहावे लागणार आहे, काय या पाच हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?" असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सरकारचा हा निर्णय केवळ बनवाबनवी असून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुरू असलेल्या आंदोलनांपासून व मोर्चान्पासून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा हा एक राजकीय डाव आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी हिताचे रक्षण होत नसून उलट शेतकऱ्यांचा अपमान होत आहे. शेतकऱ्यांना नाममात्र मदत देऊन सरकार त्यांची क्रूर थट्टा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आगामी नारायण गडावरील पारंपरिक दसरा मेळाव्यात शिलंगण खेळण्यासाठी राज्यभरातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करतानाच त्यांनी शेतकरी प्रश्नांवर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारविरोधी आपली भूमिका अधिक आक्रमक ठेवली आहे. सरकारच्या या तुटपुंज्या मदतीविरोधात ग्रामीण भागात आणि शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली असून, शासनाने सरसकट कर्जमाफीसह हेक्टरी भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel





Wenn man Krautersalz selber macht, kann man die Mischung genau nach eigenen Vorlieben anpassen.
Sie mochten [url=https://bestattungen-vonderheydt.de/2026/10/13/kraeutersalz-selber-machen-so-wird-es-aromatischer-als-gekauft/]herbal salt with dried herbs[/url] selbst herstellen, um ein aromatisches und naturbelassenes Krautersalz zu erhalten.
Zuerst sollte man frische Krauter auswahlen, die gut zu den Gerichten passen, die man zubereiten mochte.Um ein sauberes Ergebnis zu erzielen, empfiehlt es sich, die Krauter nach dem Waschen vollstandig trocknen zu lassen.