कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील अत्यंत लोकप्रिय असणारी महादेवी उर्फ 'माधुरी' हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मागील काही महिन्यांपासून कायदेशीर बाबी, विविध समित्यांचे दौरे आणि प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या 'पेटा' (PETA) सारख्या संस्थांच्या विरोधामुळे चर्चेत असलेली माधुरी हत्तीण आता गुजरात येथील 'वनतारा' पुनर्वसन केंद्रातून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी म्हणजेच कोल्हापूरच्या नांदणी मठात परतणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट करत याबाबतची माहिती दिली असून, माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना झाली असून पुढील दोन दिवसांत तिचे कोल्हापुरात जल्लोषात आगमन होणार आहे.
काय होते प्रकरण आणि कायदेशीर लढा:
काही महिन्यांपूर्वी नांदणी मठाकडील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या प्रकृतीवरून आणि सुरक्षेच्या कारणास्तव तिला उपचारासाठी आणि देखभालीसाठी गुजरात येथील 'वनतारा' केंद्रात हलवण्यात आले होते. त्यानंतर हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात परत आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि नेत्यांनी तीव्र आंदोलने व कायदेशीर पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र शासन, सेंट्रल झू अथॉरिटी आणि उच्चस्तरीय समितीच्या निर्देशानुसार नांदणी मठात माधुरीसाठी सर्व आधुनिक सोयीसुविधा आणि हत्तीसाठी लागणारे आवश्यक वातावरण तयार करण्यात आले. संयुक्त समितीने नुकतीच नांदणी येथील उभारलेल्या सुविधा केंद्राची पाहणी करून आपला अनुकूल अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर केला होता.
सुनावणीनंतर मठाच्या बाजूने निकाल आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण:
बुधवारी सायंकाळी यासंदर्भात ऑनलाइन सुनावणी पार पडली, ज्यामध्ये 'पेटा' संस्थेने माधुरीला मठात पाठवण्यास विरोध दर्शवला. मात्र, नांदणी मठाचे वकील ॲड. मनोज पाटील यांनी युक्तिवाद केला की, मठात हत्तीणीसाठी तात्पुरत्या स्वरूपात सर्व आवश्यक सूचनांनुसार सोयीसुविधा तयार करण्यात आल्या असून भविष्यात आणखी प्रशस्त असे 'माधुरीवाडा' नावाचे हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. सर्व बाजू आणि अहवालांची शहानिशा केल्यानंतर उच्चस्तरीय समितीने निर्णय सुनावला, ज्यामुळे अखेर माधुरीच्या घरवापसीचे वेध नांदणीकरांना लागले आहेत. माधुरीच्या परतीच्या या बातमीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात आणि विशेषतः शिरोळच्या नांदणी परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




