पुणे जिल्ह्यात मागील काळात झालेल्या मुसळधार अतिवृष्टी आणि पुरामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्ते, पूल आणि मोऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, जिल्ह्यातील तब्बल सात तालुक्यांमध्ये १६६.११ किलोमीटर लांबीचे रस्ते आणि तब्बल १०७ पूल व मोऱ्या अतिवृष्टीमुळे बाधित झाल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व नुकसान झालेल्या रस्त्यांची आणि पुलांच्या तातडीने दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने शासनाकडे तब्बल ६८ कोटी २६ लाख रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली आहे.
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रामुख्याने डोंगराळ आणि घाटमाथ्याचा भाग असलेल्या सात तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. यामध्ये भोर, मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या दुर्गम भागांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर धूप झाली असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवरून पाण्याचा प्रवाह वाहत राहिल्याने रस्ते वाहून गेले आहेत, तर अनेक पूल व मोऱ्यांच्या संरचनेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील दळणवळण आणि शाळकरी मुलांची व कामगारांची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी या रस्त्यांची आणि पुलांची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
संबंधित सात तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्त्यांची एकूण लांबी ४ हजार ८७०.३१ किलोमीटर असून, त्यापैकी १६६.११ किलोमीटरचे रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीनुसार, नुकसानग्रस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४९ कोटी १६ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे, तर पूल व मोऱ्यांच्या पुनर्बाबांधणी व दुरुस्तीसाठी १९ कोटी १० लाख रुपयांची गरज भासणार आहे.
तालुकनिहाय नुकसानीची सविस्तर स्थिती:
-
मुळशी तालुका: येथे सर्वाधिक ६५.८० किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाले असून २२ पूल व मोऱ्यांना फटका बसला आहे. या कामांसाठी प्रशासनाने १७ कोटी ६५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
-
खेड तालुका: ३३.८३ किलोमीटर रस्ते आणि सर्वाधिक ३० पूल व मोऱ्यांचे नुकसान झाले असून, दुरुस्तीसाठी तब्बल २३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
-
भोर तालुका: १९.६६ किलोमीटर रस्ते आणि ३ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून १० कोटी ७५ लाख रुपयांची गरज आहे.
-
जुन्नर तालुका: १५.४० किलोमीटर रस्ते आणि २२ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून ६ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मागितला आहे.
-
आंबेगाव तालुका: १२.७० किलोमीटर रस्ते आणि ८ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून ४ कोटी ८१ लाख रुपये आवश्यक आहेत.
-
मावळ तालुका: १५ किलोमीटर रस्ते आणि २ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून २ कोटी ५० लाख रुपयांची मागणी आहे.
-
वेल्हे तालुका: ३.७२ किलोमीटर रस्ते आणि २० पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून ३ कोटी २५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
ग्रामीण भागातील या महत्त्वाच्या रस्त्यांची आणि पुलांची तातडीने मलमपट्टी करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून, लवकरात लवकर निधी प्राप्त होऊन दुरुस्तीचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!























Subscribe to my channel



