भारतीय जनता पार्टीचे (BJP) संस्थापक सदस्य, देशाचे माजी उपपंतप्रधान आणि मार्गदर्शक मंडळOतील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ९८ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना शुक्रवारी रात्री उशिरा अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील प्रसिद्ध अशा इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वयोमानामुळे उद्भवलेल्या त्रासामुळे आणि प्रामुख्याने छातीत संसर्ग (Chest Infection) झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर विशेष वैयक्तिक वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.
आयसीयूत (ICU) सुरू आहेत उपचार, प्रकृती स्थिर:
वैद्यकीय सूत्रांनी आणि रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, लालकृष्ण अडवाणी यांना उपचारासाठी थेट गहन चिकित्सा युनिटमध्ये (ICU) आणि पल्मोनरी विभागामध्ये ठेवण्यात आले आहे. न्यूरोलॉजी आणि पल्मोनरी विभागातील वरिष्ठ तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली (Medical Observation) ठेवण्यात आले आहे. या वृत्ताची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात असून अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी घेतली भेट:
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समजताच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तात्काळ अपोलो रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी रुग्णालयात जाऊन लालकृष्ण अडवाणी यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली तसेच डॉक्टरांकडून उपचाराची सविस्तर माहिती जाणून घेतली. देश-विदेशातून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
शहर
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel




