सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जुलैपासून महागाई भत्ता ३% वाढण्याची शक्यता; पगारातही होणार वाढ
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलै २०२६ पासून महागाई भत्त्यात (DA) सुमारे ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात वाढ होणार असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या औद्योगिक कामगार ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या ताज्या आकडेवारीनुसार, मे २०२६ मध्ये निर्देशांक १४९.९ वरून १५०.८ वर पोहोचला आहे. या वाढीमुळे महागाई भत्त्यात किमान ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ मंजूर केली होती. आता आणखी ३ टक्क्यांची वाढ झाल्यास महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
८वा वेतन आयोग कधी लागू होणार?
केंद्र सरकारी कर्मचारी सध्या ८व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, आयोगाच्या शिफारशी पुढील वर्षाच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे. नवीन वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येऊ शकतो.
जर हा निर्णय झाला, तर कर्मचाऱ्यांना १८ ते २४ महिन्यांची थकबाकी (Arrears) एकरकमी मिळू शकते. जुलै २०२६ मधील महागाई भत्त्याची वाढ सातव्या वेतन आयोगाच्या आधारे दिली जाईल आणि त्यानंतर ८वा वेतन आयोग लागू झाल्यास वेतनातील व महागाई भत्त्यातील तफावतही कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
अधिकृत घोषणा कधी?
जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची औपचारिक घोषणा ऑक्टोबरमध्ये, दिवाळीच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर जाहीर केला जाईल.
टीप: महागाई भत्त्यातील वाढ आणि ८व्या वेतन आयोगासंदर्भातील काही बाबी सध्या उपलब्ध आकडेवारी व संभाव्य अंदाजांवर आधारित आहेत. अधिकृत निर्णय केंद्र सरकारच्या घोषणेनंतरच निश्चित होईल.
प्रतिनिधी - वंदना वेदपाठक
शहर
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- पुणे: खडकवासला-फुरसुंगी बोगद्यातून २० हजार कोटींची जमीन मोकळी होणार! पाणी बचतीसह वाहतुकीलाही मिळणार मोठी चालना
महाराष्ट्र
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- कोल्हापूर: त्रिपुरारी पहाट! ५१ हजार दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट; बोचऱ्या थंडीतही कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त सहभाग
गुन्हा
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात

























Subscribe to my channel



