पुणे- पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयामध्ये मा. न्यायाधीश श्री अमोल शिंदे यांच्या समोर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या बदनामीच्या खटल्याची सुनावणी पार पडली. खटला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पंतू सात्यकी सावरकर
यांनी दाखल केला आहे.
आजच्या सुनावणी दरम्यान राहुल गांधी यांच्या वतीने ॲड.मिलिंद दत्तात्रय पवार यांनी सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी घेतली.
उलटतपासणी मध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रश्नोत्तरं झाली. उलटतपासणी दरम्यान सात्यकी सावरकर यांनी न्यायालयासमोर मान्य केले की, राहुल गांधी यांनी लंडन येथे केलेले भाषण खरे अथवा खोटे असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादी पक्षावर आहे.
तसेच राहुल गांधी यांना कोणतीही कायदेशीर नोटीस किंवा खुलासा मागविण्याची संधी न देता थेट न्यायालयामध्ये बदनामीचा खटला दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी कबूल केले.
तसेच त्यांनी माजी केंद्रीय मंत्री श्री. अरूण शौरी तसेच जेष्ठ पत्रकार श्री. निरंजन टकले यांनी सावरकरां विषयी बदनामीकारक
लिखाण केल्याचे सांगून मात्र त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याच बरोबर अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये सावरकरां व्यतिरिक्त इतर अनेक क्रांतिकारकांनीही कठोर शिक्षा भोगल्या, त्याग केला आणि बलिदान दिले,
मात्र त्यांची लोकप्रियता तुलनेने कमी का राहिली याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सात्यकी सावरकर यांनी “त्या क्रांतिकारकांवर कमी प्रमाणात संशोधन झाले, त्यामुळे ते लोकप्रियतेपासून दूर राहिले,” असे उत्तर दिले.
तसेच माझी जन्मठेप या पुस्तकातील घटना म्हणजे कोलू फिरवला, काथ्या कुटला, दगडावर कविता लिहल्या या घटनांना पुरावे नाहीत म्हणून त्या पुस्तकातील घटना कपोलकल्पित असून वास्तवाशी धरून
नाहीत हे खरे नाही असे न्यायालयात सांगितले.
आज न्यायालयाची कामकाजाची वेळ संपल्यामुळे सुनावणी अपूर्ण राहिली असून खटला पुढील तारखेसाठी तहकूब करण्यात आला आहे. पुढील तारीख २५ मे २०२६ ही आहे.
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel





https://shorturl.fm/KHadE
https://shorturl.fm/fsiXv