पुण्यातील धायरी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका ५७ वर्षीय सासऱ्याने आपल्या ३१ वर्षीय सुनेची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्या घरात असलेल्या केवळ सहा महिन्यांच्या चिमुकल्या समोर करण्यात आली.
नेमकी घटना काय?
स्वाती तेजस चौधरी (वय ३१) असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी सासरा भानुदास भास्कर चौधरी (वय ५७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती यांचे पती तेजस चौधरी हे शिवाजीनगर न्यायालयात लिपिक (Clerk) म्हणून कार्यरत आहेत.
शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यावेळी घरात स्वाती, त्यांचे सहा महिन्यांचे बाळ आणि सासरा भानुदास हे तिघेच होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वाती आणि भानुदास यांच्यात घरगुती कारणावरून जोरात भांडण झाले.
या वादाच्या भरात आरोपी सासऱ्याने स्वाती यांना बाथरूममध्ये गाठले.
तिथे त्यांचे डोके भिंतीवर जोराने आपटले आणि त्यानंतर कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जड दगडाने त्यांच्या डोक्यावर प्रहार केले. या भीषण हल्ल्यात स्वाती यांचा जागीच मृत्यू झाला.
असा झाला खुनाचा उलगडा: गुन्हा केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावले आणि तो तिथून पसार झाला. दुपारी दीडच्या सुमारास घरातून बाळाच्या रडण्याचा सतत आवाज येत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. स्वाती यांच्या नणंदेनेही त्यांना फोन केला होता, पण तो उचलला जात नव्हता.
शेवटी शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, स्वाती रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या आणि बाळ त्यांच्या शेजारी रडत होते. नांदेड सिटी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून फरार सासऱ्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे धायरी परिसरात प्रचंड दहशतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

