मुंबई: केवळ पितृत्वाबाबत वाद किंवा दावा आहे म्हणून कोणत्याही प्रकरणात सरसकट डीएनए चाचणीचे (DNA Test) आदेश दिले जाऊ शकत नाहीत, असे अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. डीएनए चाचणी ही कोणतीही साधी किंवा नियमित तपासणी नसून ती केवळ काही विशेष आणि अपवादात्मक कारणास्तवच केली जाणारी वैज्ञानिक चाचणी आहे, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने नाशिक येथील कनिष्ठ न्यायालयाचा डीएनए चाचणी करण्याचा आदेश रद्दबातल ठरवला आहे.
काय आहे नेमके प्रकरण? नाशिक येथील एका १९ वर्षीय तरुणाने एका मृत हॉटेल व्यावसायिकाच्या संपत्तीमध्ये स्वतःचा ५ वा हिस्सा (वाटा) मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. तो तरुण संबंधित हॉटेल व्यावसायिकाचा अनौरस मुलगा असल्याचा दावा करत होता. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्याने न्यायालयात डीएनए चाचणी करण्याची मागणी करणारा अर्ज दिला होता. नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने (दिवाणी न्यायालय) हा अर्ज मंजूर करून तरुणाची आणि हॉटेल व्यावसायिकाच्या मुलांची डीएनए चाचणी करण्याचे आदेश प्रादेशिक फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेला दिले होते.
कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाविरोधात मृत हॉटेल व्यावसायिकाची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि या निर्णयाला आव्हान दिले.
उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय आणि निरीक्षणे: मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मार्ने यांच्या एकल पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने कायदेशीर बाजू स्पष्ट करताना सांगितले की, डीएनए चाचणीबाबतचे कायदे अतिशय स्पष्ट आहेत. अशा प्रकारच्या चाचण्यांचे आदेश न्यायालयात नियमितपणे किंवा अगदी सहज दिले जाऊ शकत नाहीत.
न्यायूर्तींनी नमूद केले की, कोणतीही वैज्ञानिक चाचणी किंवा डीएनए टेस्टचा आदेश देण्यापूर्वी न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांची छाननी करणे बंधनकारक असते. संबंधित व्यक्तीने आपल्या दाव्याच्या बाजूने किंवा मूळ मुद्द्यांच्या समर्थनासाठी प्रथम स्वतः प्राथमिक पुरावे न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे. केवळ एखाद्या पक्षाने प्रतिवाद केला किंवा दोन्ही बाजूने तोंडी दावे-प्रतिदावे झाले, म्हणून न्यायालयाने पुराव्यांची जमवाजमव करण्यासाठी सरळ डीएनए चाचणीचा मार्ग पत्करणे चुकीचे ठरते.
तसेच, खटल्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच (Threshold Stage) अशा प्रकारे डीएनए चाचणीचे आदेश देणे पूर्णपणे अनावश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. खटल्यामधील सर्व पुरावे तपासल्यानंतर जर न्यायालयाला असे वाटले की, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कोणत्याही निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचणे अशक्य आहे आणि खटला सोडवण्यासाठी वैज्ञानिक पुराव्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, अशा अत्यंत अपवादात्मक आणि विशेष परिस्थितीतच न्यायालयाकडून अंतिम उपाय म्हणून डीएनए चाचणीचे आदेश दिले जाऊ शकतात.
या निरीक्षणानंतर उच्च न्यायालयाने नाशिक न्यायालयाचा आदेश फेटाळून लावला. मात्र, भविष्यात पुरावे नोंदवून झाल्यानंतर जर खटला चालवण्यासाठी अशी चाचणी खरोखरच अपरिहार्य ठरली, तर तो तरुण नियमानुसार नव्याने अर्ज करू शकतो, असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका निकाली काढली.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




