पुणे: पाणीटंचाईच्या संकटाने हैराण झालेल्या बारामतीकरांना सोमवारी (दि. २) पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसाने मोठा दिलासा दिला. मात्र, या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. अवघ्या काही तासांत शहरात १५८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, त्यानंतरही सुमारे तीन तास पाऊस सुरू होता. त्यामुळे पावसाचे प्रमाण २०० मिलिमीटरच्या पुढे गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भिगवण रस्त्याला तलावाचे स्वरूप आले, अनेक वाहने पाण्यात अडकली, तर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर असलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळ परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेच्या शाळांसह खासगी शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली.
यंदा अत्यल्प पावसामुळे बारामती शहर आणि तालुक्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नीरा डावा कालवा बंद असल्याने शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जिरायती भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला होता. अनेक विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावली होती. अशा परिस्थितीत सोमवारी पहाटे अचानक झालेल्या जोरदार पावसाने नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, पावसाच्या तीव्रतेमुळे शहरातील सखल भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले.
भिगवण रस्त्यावर वाहनांची कोंडी
रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. भिगवण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही वाहने बंद पडली. एका एसटी बसची चाके पाण्यात बुडाली, तर काही कार बोनेटपर्यंत पाण्यात अडकल्याचे चित्र होते. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरही पाणी साचल्याने स्मृतिस्थळ परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. शहरातील पाणी साचलेल्या भागांतून वाहतूक सुरळीत करण्यासाठी नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा कामाला लागली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून आढावा
पावसाची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. शहरातील भिगवण रस्त्यासह अन्य सखल भागांतील पाण्याचा तातडीने निचरा करावा, सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. शहर आणि तालुक्यात पावसामुळे झालेल्या संभाव्य नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पंचनामे करावेत, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. दरम्यान, काही ठिकाणी पाणी साचले असले तरी कोणतीही पडझड अथवा जीवित-वित्तहानी झालेली नसून सध्या पूरस्थितीचा धोका नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नगराध्यक्ष सचिन सातव यांनीही नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा सतर्क असल्याच सांगितले. पाणी साचलेल्या ठिकाणी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून अडथळे दूर करत आहेत. रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असून नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
द्राक्ष, डाळिंब उत्पादकांची चिंता वाढली
पावसामुळे ऊस उत्पादक आणि चारा पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी अचानक झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसाने द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांची चिंता वाढवली आहे. शेतात पाणी साचल्यास पिकांच्या मुळांना इजा होऊन मूळकुज होण्याची शक्यता आहे. कृषी विज्ञान केंद्राचे कृषितज्ज्ञ संतोष करंजे यांनी शेतकऱ्यांना पाण्याचा योग्य निचरा करण्याचा सल्ला दिला आहे. शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्याबरोबरच शक्य तेथे पाणी जमिनीत जिरविणे आवश्यक आहे. अन्यथा पाणी वाहून जाऊन त्याचा शेतीला अपेक्षित फायदा होणार नाही. द्राक्ष आणि डाळिंब पिकांवर संभाव्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता म्हणून बुरशीनाशकांची फवारणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
तालुक्यात पावसाची आकडेवारी मिमी मध्ये
सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बारामती शहरात १५८ मि.मी. पावसाची नोंद झाली. के. व्ही. के. माळेगाव बुद्रुक येथे ९४.८, सावंतवाडी येथे ८०, बहऱ्हाणपूर आणि डोर्लेवाडी येथे प्रत्येकी ७८, गुणवडी येथे ७४, जैनकवाडी येथे ६८, तर मुर्ती आणि अंजनगाव येथे प्रत्येकी ६५ मिलिमीटर पाऊस झाला. जळगाव क.प. येथे ६०, बारामती अॅग्रो परिसरात ५६, जळगाव सुपे येथे ५५, चांदगुडेवाडी येथे ४६, तर सायंबाचीवाडी येथे ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुसरीकडे माळेगाव कॉलनी येथे ८, मोरगाव, सुपे आणि सांगवी येथे प्रत्येकी ७, उंडवडी क.प. येथे ६, वडगाव निंबाळकर येथे ५, तर चौधरवाडी येथे अवघा ३.५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यात काही भागांत दमदार पाऊस झाला असला, तरी अनेक गावांना अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
शहर
- मुंबई: सणासुदीच्या तोंडावर मोठी कारवाई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून तब्बल ९ कोटी रुपयांचा खाद्य साठा जप्त; पतंजली तुपासह १९ जणांचे परवाने निलंबित
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
महाराष्ट्र
- मुंबई: सणासुदीच्या तोंडावर मोठी कारवाई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून तब्बल ९ कोटी रुपयांचा खाद्य साठा जप्त; पतंजली तुपासह १९ जणांचे परवाने निलंबित
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- रायगड: साडू, मुलाचा दारू कारखाना चालतोय, मग पर्यावरणपूरक 'टोरेंट' प्रकल्पाला विरोध का? आमदार महेंद्र थोरवे यांचा खासदार सुनील तटकारेंवर हल्लाबोल
- अहिल्यानगर: जिल्हा बँक निवडणुकीत खासदार नीलेश लंके विजयी, आमदार पराभूत
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी


























Subscribe to my channel




