
Chhatrapati Sambhaji Nagar : मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहे. यात अनेक राजकीय नेत्यांची घरं आणि कार्यालय पेटवून देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून विशेष सूचना देण्यात आल्या आहे. यापुढे होणाऱ्या हिसंक आंदोलनात बघ्याची भूमिका घेऊ नका, तोडफोड आणि नुकसान होत असल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस आता अलर्ट मोडवर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागलं. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके, संदीप क्षीरसागर यांची घरं पेटवून देण्यात आली. सोबतच राष्ट्रवादीचे कार्यालय देखील पेटवण्यात आले.बीड शहरातील बस स्थानकात आंदोलकांनी तब्बल 72 बस फोडल्या. तिकडे हिंगोली जिल्ह्यात देखील भाजपचा कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकंदरीत या सर्व परिस्थितीनंतर मराठवाड्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आता पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता थेट कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि जिल्ह्यातील पोलीस देखील अलर्ट झाले आहे.
|
|
पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा...
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण लागत असल्याने पोलीस देखील आता अलर्ट झाले आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण पोलीस या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक आंदोलनावर लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या उपोषण आणि आंदोलन याची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. सोबतच राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या बाहेर देखील पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि पोलीसांच्या बैठकीत काय काय घडलं?
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात हिसंक वळण लागत असल्याने याची दखल घेत, सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांची बैठक झाली आहे. यावेळी पोलीस महसंचालक यांनी सोमवारी दिवसभराच्या घडामोडींचा आढावा सादर केला. मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत, य समाजकंटकांचा शोधण्याचं काम सुरू आहे, घरं जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे, जे या आंदोलनांचा गैरफायदा घेऊ शकतात, या समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या तयार करण्यात येत आहेत, गुप्तचर यंत्रणा यावर काम करत असल्याची माहिती पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिली आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



