Brijbhushan Singh : बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप; विनेश फोगाट, साक्षी मलिक यांचं आंदोलन

नवी दिल्ली : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी बुधवारी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.यासाठी या दोघी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात आंदोलनाला बसले आहेत.

कुस्ती फेडरेशन आपल्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करत असून यावरुन आम्हाला त्रास दिला जात असून छळही केला जात आहे. आम्ही ज्यावेळी ऑलिम्पिकमध्ये गेले होतो तेव्हा आम्हाला फिजिओथेरपिस्ट आणि कोचही दिला गेला नाही.त्यावेळेपासून आम्ही आवाज उठवत आहोत. यानंतर आम्हाला धमक्या देखील दिल्या गेल्या आहेत, असा आरोप भारतीय कुस्तीपटूंनी केला आहे.

दरम्यान, पुरुष प्रशिक्षकांकडून महिला खेळाडूंना आणि महिला प्रशिक्षकांना त्रास दिला जात आहे. तसेच जे फेडरेशनच्या मर्जीतले प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडून महिला प्रशिक्षकांशी गैरवर्तनही केलं गेलं आहे.त्यांनी महिला खेळाडुंचे लैंगिक शोषण केलं आहे, खुद्द फेडरेशनच्या अध्यक्षांनीच अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे, असा खळबळजनक आरोप कुस्तीपटून विनेश फोगाट हीनं केलं आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *