सांगली: जिल्ह्यातील सांगलीवाडी येथून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एटीएम मशीन फोडून किंवा गॅस कटरचा वापर करून पैसे चोरण्याच्या घटना आपण यापूर्वी अनेकदा ऐकल्या असतील; परंतु सांगलीवाडीत चोरांनी चक्क एक पाऊल पुढे जात कोणतेही मशीन न फोडता थेट संपूर्ण एचडीएफसी (HDFC) बँकेचे एटीएम मशीनच लंपास केले आहे. या चोरी गेलेल्या एटीएम मशिनमध्ये तब्बल १० लाख ३४ हजार रुपयांची रोकड असल्याची माहिती समोर आली असून, या दु साहसी चोरीमुळे संपूर्ण परिसरात आणि बँकिंग वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सुरक्षारक्षकाचा अभाव ठरला कारणीभूत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक तैनात नसल्याचा फायदा घेत चोरांनी अत्यंत चाणाक्षपणे हा संपूर्ण डाव रचला. एनसीआर कॉर्पोरेशन कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी यांनी या चोरीसंदर्भात पोलिसांत अधिकृत फिर्याद दाखल केली आहे. बहुतांश एटीएम केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा सुरक्षारक्षक नेमला जात नसल्यामुळे चोरांचे फावले असून, रात्रीच्या वेळी अशा प्रकारच्या घटनांना सहज वाव मिळत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सुरक्षेच्या या त्रुटींमुळे बँकांच्या कारभारावर आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान चोरांनी एटीएम मशीन कट न करता ते मूळ जागेवरूनच मुळापासून उखडून किंवा काढून पळवल्यामुळे पोलिसांसमोर या चोरांचा शोध घेणे हे एक मोठे आव्हान ठरले आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वीही मिरज तालुक्यातील बेडग-आरग रस्ता तसेच बुधगाव परिसरात अशा प्रकारच्या चोऱ्यांचे प्रकार घडले होते. आता सांगलीवाडीतील या नवीन घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरात लवकर या गुन्हेगारांना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शहर
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
महाराष्ट्र
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- वर्धा: 'घरकुल योजनेचा' लाभ न मिळाल्याने थेट नगरपरिषदेत नागरिकाने अंगावर ओतून घेतले रॉकेल!
- परभणी: बळीराज्याला वाऱ्यावर सोडणार नाही, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच; परभणीत एकनाथ शिंदेंची ठाम ग्वाही!
- सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाचे तांडव! कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
























Subscribe to my channel





Discovered this while browsing for a new regular and it has been a solid pick ever since. The promo calendar is actually easy to follow and the rewards feel fair. Speedy login portal and the game filters make it easy to find exactly what I want. Customer service is polite and answers every ticket promptly. Really glad I gave it a shot. pejilimacao