सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा गावाजवळ सोमवार (८ जून २०२६) रोजी सकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. गुळवंचीहून विटा घेऊन नान्नजकडे जाणाऱ्या एका भरधाव डंपरने (क्रमांक: MH 20 DE 4266) दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी गोळा झालेल्या संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावून पेटवून दिले, ज्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, कारंबा येथील रहिवासी असलेले धोंडप्पा जोडमोटे (वय ७० वर्ष) हे सोमवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास कारंबा-नान्नज रस्त्यावरील आपल्या शेताकडे नेहमीप्रमाणे पायी चालले होते. त्याच वेळी गावातीलच मल्लिनाथ हिप्परगी (वय ६० वर्ष) हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांनी धोंडप्पा यांना पाहिले आणि त्यांना शेतापर्यंत सोडण्याची तयारी दाखवली.
दोघेही दुचाकीवरून शेताजवळ पोहोचले आणि रस्त्यावरून शेताच्या दिशेने वळत असतानाच मागून आलेल्या एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकी डंपरखाली अडकली आणि दोघेही काही अंतरापर्यंत फरफटत गेले. या गंभीर अपघातात धोंडप्पा जोडमोटे यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक मल्लिनाथ हिप्परगी हे गंभीर जखमी झाले.
संतप्त गावकऱ्यांनी डंपर पेटवला; चालक फरार
अपघाताची माहिती मिळताच कारंबा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. भरधाव डंपर चालकामुळे निष्पाप शेतकऱ्याचा जीव गेल्याने नागरिक प्रचंड आक्रमक झाले. संतप्त झालेल्या जमावाने अपघातग्रस्त डंपरवर दगडफेक करत त्याला आग लावून दिली. बघता बघता डंपर जळून खाक झाला. अपघातानंतर डंपर चालक तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या बंबाला पाचारण केले आणि डंपरची आग आटोक्यात आणली. पोलिसांनी गंभीर जखमी मल्लिनाथ हिप्परगी यांना तातडीने मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मृत धोंडप्पा जोडमोटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मोठा परिवार असून त्यांच्या अपघाती निधनामुळे कारंबा गावात शोककळा पसरली आहे. पोलीस सध्या फरार डंपर चालक आणि मालकाचा शोध घेत आहेत.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




