
Akkalkot To Trimbakeshwar : अक्कलकोटवरून त्र्यंबकेश्वरला आणि त्र्यंबकेश्वरवरून अक्कलकोटला जाणं आता अधिक सोपं आणि वेगवान होणार आहे. कारण अक्कलकोट ते त्र्यंबकेश्वर हा प्रवास फक्त ४ तासांचा होणार आहे. राज्यात आणखी एक नवा महामार्ग तयार होणार आहे. या महामार्गामुळे अनेक शहरं जवळ येणार आहेत. चेन्नई ते सूरत द्रुतगती महामार्ग प्रकल्पातील रखडलेल्या नाशिक ते अक्कलकोट या महामार्गाचा तिढा सुटला आहे. आता बीटीओ तत्वावर हा महामार्ग बांधण्यात येणार आहे.
हा महामार्ग तयार झाल्यानंतर अक्कलकोट ते नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हा प्रवास काही तासांचाच होणार आहे. हा ३७४ किलोमीटरचा प्रवास तुम्हाला फक्त ४ तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे अक्कलकोट ते नाशिक हा प्रवास करण्यासाठी सध्या ९ तासांचा कालावधी लागतो जो निम्म्यापेक्षा कमी होणार आहे. फक्त ४ तासांत तुम्हाला त्र्यंबकेश्वर गाठता येणार आहे. त्र्यंबकेश्वर (नाशिक) ते अक्कलकोट हा महामार्ग २ टप्प्यामध्ये तयार करण्यात येणार आहे. पहिला टप्पा नाशिक ते अहिल्यानगर १५२ किमीचा असणार आहे. तर दुसरा टप्पा अहिल्यानगर ते अक्कलकोट हा २२२ किमीचा असणार आहे.
|
|
एनएचएआय या कंपनीने १,२७१ किलो मीटर लांबीचा चेन्नई ते सूरत या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेतले आहे. चेन्नई ते सूरत या महामार्गामुळे अनेक शहरं आणि राज्य जवळ येणार आहेत. हा महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या ६ राज्यांमधून जाणार आहे. तसंच, या महामार्गामुळे सूरत, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कुलबुर्गी, कुरनूल, कडप्पा आणि तिरुपती ही प्रमुख शहरं जोडली जाणार आहेत. हा महामार्ग तयार झाल्यानंतर नागरिकांना अगदी कमी तासांत वेगवान प्रवास करता येणार आहे.
चेन्नई -सूरत हा द्रुतगती महामार्ग सूरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई या दोन टप्प्यामध्ये तयार केला जाणार आहे. या दोन टप्प्यात आणखी काही टप्पे आहेत. यामधील पहिला टप्पा नाशिक- अक्कलकोट हा ३७४ किमी लांबीचा आणि सहा मार्गिकेचा महामार्ग असणार आहे. हा महामार्ग एनएचएआय कंपनी बांधणार आहे.आता या महामार्गाचे काम बीओटी तत्वावर करण्यात येणार आहे.
शहर
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
- पुणे: शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; महिला वकिलांनी मांडल्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी
- पुणे: मोठ्या गाड्यांमधून फिरणाऱ्या अन् बंगल्यांमध्ये राहणाऱ्यांना ५ हजार रुपयांचे महत्त्व कळणार नाही: देवेंद्र फडणवीस
- मुंबई: कल्याणमध्ये संतापजनक प्रकार परफ्यूम खरेदी करण्यास नकार दिल्याने तरुण-तरुणीवर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला, दोघांना बेड्या
महाराष्ट्र
- जालना: सरकारी कार्यालयात दिवाळीऐवजी शिमगा! अंबड तहसीलदारांसमोरच लिपिक अन् कोतवालात आर्थिक देवाणघेवाणीवरून तुफान हाणामारी,
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
- पुणे: शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; महिला वकिलांनी मांडल्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी
- पुणे: मोठ्या गाड्यांमधून फिरणाऱ्या अन् बंगल्यांमध्ये राहणाऱ्यांना ५ हजार रुपयांचे महत्त्व कळणार नाही: देवेंद्र फडणवीस
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी



























Subscribe to my channel




