Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

image

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला २५ दिवस पूर्ण झाले. या अपघाताचा तपास सुरू आहे पण अद्याप हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण समोर आले नाही. हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आतापर्यंत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी यासंदर्भात मुंबईत दोन पत्रकार परिषद घेतल्या होत्या.

आज त्यांनी थेट दिल्लीमध्ये तिसरी पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी VSR कंपनीला अनेक राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *