गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथे सती नदीत बुडून तीन चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अत्यंत दुःखद घटनेमुळे संपूर्ण गावासह परिसरावर आणि जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी दुपारी धान रोवणीच्या कामासाठी पालकांसह घरातील सर्वजण शेतात गेले होते. आई-वडील शेतात कामात व्यस्त असताना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास गावाजवळ वाहणाऱ्या सती नदीवर आंघोळीसाठी गेले होते.
नदीवर पोहोचल्यानंतर हे सर्व मुले आनंदाने नदीत उतरली, परंतु त्यांना नदीतील पाण्याची खोली आणि तीव्र पाण्याचा प्रवाह याचा अजिबात अंदाज आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोली जास्त असल्यामुळे या चार विद्यार्थ्यांपैकी तिघे जण खोल पाण्यात बुडाले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे त्यांच्यासोबत असलेल्या चौथ्या विद्यार्थ्याने कमालीचे प्रसंगावधान राखले. त्याने घाबरून न जाता तातडीने नदीतून बाहेर येत गावात धाव घेतली आणि घडलेल्या प्रकारची माहिती ग्रामस्थांना दिली.
मुले नदीत बुडाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच ग्रामस्थांनी आणि स्थानिक मच्छिमारांनी तातडीने सती नदीच्या दिशेने धाव घेतली. गावकऱ्यांनी नदीत उतरून तात्काळ शोधमोहीम राबवली आणि तिन्ही विद्यार्थ्यांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, पोलीस पथक आणि आपत्ती निवारण विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचा पंचनामा केला.
या दुर्घटनेत मृत पावलेल्या मुलांमध्ये लक्ष्मण सुन्हेर दुधकंवर (वय ६), कुणाल रमेश दुधकंवर (वय ५) आणि मोहित हिवराज सराटे (वय ११) अशी या दुर्दैवी बालकांची नावे आहेत. एकाच गावातील तीन चिमुळत्या मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्यामुळे खेडेगाव येथील प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले असून, संपूर्ण गावात वस्तीवर मोठा शोकसागर लोटला आहे. ऐन सणासुदीच्या किंवा कामाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
महाराष्ट्र
- मुंबई: ठाणे जिल्ह्यातही सार्वजनिक उत्सवांमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी घाला; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आक्रमक मागणी
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कथित भ्रष्टाचार; सभापतींच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
- बीड: शासनाने १२ मागण्या मान्य केल्यावरही मुंबई मोर्चाचा अट्टहास का? ज्योती मेटे यांचे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल
- कोल्हापूर: गुंतवणुकीच्या परताव्याचे आमिष दाखवून अडीच कोटींची फसवणूक; कोकणातील कसाल-गिम्वी येथून तीन जणांना बेड्या
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा





























Subscribe to my channel



