
Ajit Pawar : मी आजपर्यंत काहीही मागितलेलं नाही. मी आता फक्त तुम्हाला मतं मागतो आहे. मी खासदारकीला उमेदवार देणार आहे त्याच्यासाठी मतं मागणार असं आवाहन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या बारामतीत केलं. मी इतकी वर्षे वरिष्ठांचं ऐकलं आता माझं ऐका असंही अझित पवार म्हणाले.
इतकी वर्षे वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका..
मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की स्वच्छता ठेवा, झाडांची फुलं तोडू नका, पचापच थुंकू नका. बारामतीला देशात पहिल्या क्रमांकांचं बक्षीस मिळालं पाहिजे. बारामतीत आपण पक्षाचे पैसे घालून कामं केली आहेत. एकीकडे अजित तुम्हाला सांगतो आहे एकीकडे वरिष्ठ सांगतो आहे कुणाचं ऐकायचं? इतकी वर्षे वरिष्ठांचं ऐका. उद्या माझ्या विचारांचा खासदार दिला तर मी पंतप्रधान मोदींनी सांगेन की माझ्या लोकांनी हा खासदार दिला आहे. आपली कामं झाली पाहिजेच या दृष्टीने अडी-अडचणीला कोण मदत करतो याचा विचार करा. असं अजित पवार म्हणाले आहे.
|
|
लोकसभेला मला पावती द्यायची असेल तर
माझी तुम्हाला विनंती आहे की लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे. त्या निवडणुकीत तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर बारामतीत जो बदल आणि जे काही काम चाललं आहे जे निर्णय मी विकासासाठी घेतले ते लक्षात ठेवा. धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात. उद्या जेव्हा खासदारकीच्या निवडणुका येतील. मी उमेदवार जाहीर करेन तिथे मी उभा आहे (अजित पवार) असं समजून मतं द्या हे मी तुम्हाला सांगतो. कुणी भावनिक होतील.. आमची शेवटची निवडणूक आहे म्हणतील. अमकंच आहे, तमकंच आहे म्हणतील. त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही. तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे. असं अजित पवार म्हणाले आहेत
मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे आपल्या कामांचा वेग असाच राहण्यासाठी माझ्या विनंतीला मान देऊन सहकार्य करावं. आपण सगळ्यांनी बारकाईने विचार करा. तुम्ही मला योग्य सहकार्य केलं तर पुढची कामं होतील, नाहीतर मी तुमची कामं करण्यास बांधील नाही हे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो. असंही अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले.
आता तुम्ही विचार करायचा आहे की विकास आणि सुधारणा तुम्हाला अशाच वेगाने करायच्या आहेत की नाही? बारामतीत आर्थिक सुबत्ता कशी नांदेल यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. बारामतीसाठी आम्ही सगळेचजण जिवाचं रान करुन काम करता आहेत. असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांची सुद्धा कानउघडणी केली. अजूनही काही जण कार्यकर्त्यांची जाणीवपूर्वक नावे घेत नाहीत, पण तुमच्या गटा तटामुळे मला त्रास होतो. गट तट मला मान्य नाही. मी एकटा फिरेन, लोकं द्यायचे तेवढे मते देतील, असे म्हणत त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला कानउघडणी केली. कामे करताना मला वाईटपणा घ्यावा लागतो, उंबराचे झाड आले की काही जण दत्त जयंती करतात. पण पक्षाने फळ खाल्ले की त्याच्या विष्ठेतून नवीन झाड येते. सगळ्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. परवा गंगावेसला गेलो तिथेही मला काम करायचं आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



