विजय देवरकोंडा, रश्मिका मंदानाImage Credit source: Instagram
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणि सध्या बॉलिवूडमध्येही लोकप्रिय ठरलेली जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या लग्नामुळे तुफान चर्चेत आहेत. या दोघांच्या लग्नाविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. हे दोघं 2 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधतील, असा अंदाज आधी व्यक्त करण्यात आला होता. परंतु नंतर या चर्चा अफवा ठरल्या. आता 26 फेब्रुवारी ही नवी तारीख समोर आली आहे. या तारखेला रश्मिका आणि विजय लग्नबंधनात अडकतील, असं म्हटलं जात आहे. या दोघांच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून त्यांना तब्बल 60 कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याचं समजतंय. रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या व्हिडीओचे डिजिटल राइट्स मिळवण्यासाठी नेटफ्लिक्स इतकी मोठी रक्कम मोजण्यास तयार असल्याचं कळतंय. या चर्चांमागील नेमकं सत्य काय, ते जाणून घेऊयात..
2025 या वर्षाच्या शेवटापासूनच रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या चर्चा होत्या. अखेर फेब्रुवारीमध्ये उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्नसोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं गेलं. उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये रश्मिका-विजयचा शाही विवाहसोहळा संपन्न होईल, अशी माहिती समोर येत आहे. हे दोघं साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहेत. गेल्या काही वर्षांत रश्मिकाने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, छावा, अॅनिमल यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमधअये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तर विजयला बॉलिवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे रश्मिका आणि विजयकडे ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिलं जातं. या दोघांच्या लग्नासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. साहजिकच त्याकडे असणारी क्रेझ पाहता डिजिटल राइट्ससाठी चढाओढ सुरू असेल.
दरम्यान नेटफ्लिक्सकडून अद्याप अशी कोणतीही ऑफर देण्यात आली नाही, असं कळतंय. ऑक्टोबर महिन्यात रश्मिका आणि विजयने गुपचूप साखरपुडा केला. हे दोघं त्यांच्या लग्नसोहळ्याविषयीही कमालीची गुप्तता पाळत आहेत. अशातच नेटफ्लिक्सच्या ऑफरचे दावे समोर आल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाबद्दलच्या सर्व चर्चा खऱ्या वाटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सने अद्याप त्यांच्याशी कोणतीही डील केलेली नाही किंवा यासंबंधी संपर्क केलेला नाही.
रश्मिका आणि विजयने ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. सेटवरच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु दोघंही त्यांच्या नात्याबद्दल कधीच मोकळेपणे व्यक्त झाले नाहीत.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




