विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) सध्याच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. रोहित पवार आज किंवा उद्या पत्रकार परिषद घेणार होते, मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे.

विलीनीकरणासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, पक्षाकडून घाईघाईने कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही असे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या रणनीतीबद्दल अवगत करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची ही भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *