मुंबई: खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी 'मातोश्री' निवासस्थानी 'हनुमान चालीसा' म्हणण्याच्या दिलेल्या आव्हानानंतर राणा दाम्पत्य आणि शिवसेना असा वाद पेटला होता. नाट्यमय घडामोडींनंतर राणा दाम्पत्याविरोधात दुसऱ्या दिवशी राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला थेट आव्हान दिलं आहे. आम्हीही हनुमान चालीसा म्हणतोय, आमच्यावरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, असं थेट आव्हान फडणवीस यांनी दिलं. यावेळी फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा पठण केली.
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. भोंग्याच्या मुद्द्यावरून आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला राज्याच्या गृहमंत्र्यांनी निमंत्रण दिलं होतं. परंतु, ज्या काही घटना गेल्या चार-पाच दिवस मुंबई आणि महाराष्ट्रात घडत आहेत, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारनं संवादासाठी जागा ठेवलीय असं आम्हाला वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले. जर कोणी हिटलर प्रवृत्तीनं वागायचं ठरवलं असेल तर, संवादापेक्षा संघर्ष बरा, अशी मानसिकता झाल्यामुळं आम्ही या बैठकीवर बहिष्कार घातला आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुळातच विरोधी पक्षाला संपवण्याची अशा प्रकारची प्रवृत्ती सरकारची असेल आणि सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणात आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर पोलिसांसमक्ष हल्ले करणार असतील, तसेच त्यानंतर एफआयआर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर, अशा परिस्थितीत बैठकीला जाऊन फायदा काय? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच बघितली नाही. सरकारमधील पक्षाचे लोक पोलीस संरक्षणात विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून, जीवघेणा हल्ला करतात. पोलखोल यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आम्ही जनतेकडे मांडला. लोकशाहीत यापेक्षा वेगळं काय करायचं असतं. ज्यांना लोकशाही मान्य नाही. त्यांनी पोलखोल रथावर हल्ला केला. अशा प्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं बंद करू असं जर वाटत असेल तर हा गैरसमज मनातून काढून टाका. भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




