डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि इराणवर निर्बंध लादणाऱ्या ग्रॅहम विधेयकावर स्वाक्षरी करून त्याला कायद्याचे रूप दिले आहे. या कायद्यानुसार रशियाकडून तेल आयात करणाऱ्या किंवा निर्बंधांमधून मार्ग काढण्यास रशियाला मदत करणाऱ्या चीन आणि भारतासारख्या देशांवर 100% पर्यंत टेरिफ लादले जाऊ शकते. हा कायदा 30 दिवसांत लागू होईल आणि संबंधित देशांना त्याचे पालन करण्यासाठी 180 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कोणत्या देशांवर टेरिफ लावायचे, त्याचा दर किती असावा आणि टेरिफमधून सवलत द्यायची की नाही, हे ठरवण्याचे सर्व अधिकार कायद्याने अध्यक्षांना दिले आहेत. मात्र ट्रम्प यांच्यावर असलेला राजकीय दबाव पाहता, आपण अत्यंत बिकट परिस्थितीसाठी तयार राहणेच शहाणपणाचे ठरेल. अमेरिकेत भारतीय निर्यातीवर पुन्हा एकदा प्रचंड टेरिफ लादल्यास त्याचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेसोबतच दोन्ही देशांच्या राजकीय संबंधांनाही बसेल. भारताने आपल्या अधिकृत प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे की, देश आपल्या नागरिकांची ऊर्जा सुरक्षा राखण्यासाठी कटिबद्ध आहे. बाजारातील बदलत्या परिस्थितीनुसार विविध मार्गांनी ही गरज पूर्ण केली जाईल. या मुद्द्यावर अमेरिकन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत भारताने केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे, तर जागतिक ऊर्जा बाजारावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची जाणीवही करून दिली आहे. विविध स्रोतांकडून तेल खरेदी करण्याच्या गोष्टी केल्या जात असल्या तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. गेल्या वर्षभरात भारताने आपल्या गरजेच्या 30% ते 52% तेल एकट्या रशियाकडून घेतले आहे. ऑगस्टमध्ये भारताने 4.7 अब्ज डॉलर किमतीचे 85 लाख टन तेल खरेदी केले. तर जुलैमध्ये भारताने 7.3 अब्ज डॉलरचे विक्रमी 1 कोटी 10 लाख 40 हजार टन तेल विकत घेतले होते. त्यामुळे कोणत्याही दृष्टीने विचार केला, तरी रशियन तेलापासून दूर जाण्याचा निर्णय भारताला महागात पडू शकतो. अमेरिकेसोबतचा आपला पूर्वेतिहास पाहता, जनतेने सरकारच्या या रोखठोक भूमिकेकडे थोडे सावधगिरीने पाहणेच बरे. कारण, गेल्या एका दशकात आपले सरकार तेलाच्या बाबतीत अनेकदा अमेरिकेच्या दबावापुढे मवाळ झाले आहे. 2016-17 मध्ये भारताच्या एकूण तेल खरेदीत व्हेनेझुएलाचा वाटा 6.7% होता. परंतु 2019 मध्ये ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर निर्बंध लादले आणि 2021-22 पर्यंत ही आयात पूर्णपणे बंद झाली. इराणच्या बाबतीतला अनुभव तर याहून मोठा होता. नोव्हेंबर 2018 मध्ये अमेरिकेने ‘मॅक्सिमम प्रेशर’ धोरणांतर्गत निर्बंध लादण्यापूर्वी, भारताच्या एकूण गरजेपैकी सुमारे 10% तेलाचा पुरवठा इराण करत होता. मात्र निर्बंधांनंतर भारताने इराणकडून होणाऱ्या तेल खरेदीत मोठी कपात केली आणि 2020-21 पर्यंत ही आयात शून्यावर आली. मार्च ते जून 2026 दरम्यान अमेरिकेने मर्यादित काळासाठी इराणी तेलाच्या आयातीला परवानगी दिली, तेव्हा भारताच्या तेल आयातीत इराणचा वाटा वाढून 1.1% झाला. युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियन तेलाचा मोठा आयातदार नव्हता. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर आणि पाश्चात्त्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर तेलाचे दर गगनाला भिडले. त्यामुळे ऊर्जा गरजा भागवण्यासाठी भारताला रशियाकडे वळावे लागले. रशियानेही तेलाच्या किमतीत मोठी सवलत दिली. जागतिक बाजारातील किमती नियंत्रणात राहाव्यात म्हणून पाश्चात्त्य देशांनीही भारताच्या या रशियन तेल खरेदीला मूक पाठिंबा दिला. परंतु ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी रशियन तेल आयातीमुळे भारतावरील टेरिफ 25% वरून 50% केले. तेव्हा भारताने हळूहळू रशियाकडून तेल आयात कमी करण्यास सुरुवात केली. मात्र याच वर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे हे टेरिफ फेटाळून लावले आणि भारताची रशियन तेल खरेदी पुन्हा वाढू लागली. या परिस्थितीला तोंड देण्याच्या बाबतीत चीनच्या तुलनेत भारताकडे पर्याय मर्यादित आहेत. चीनकडे ‘रेअर अर्थ’ आणि ‘मॅग्नेट’च्या निर्यातीवर बंदी घालण्याचे मोठे अस्त्र आहे. याचा फटका अमेरिकेतील ईव्ही (इलेक्ट्रिक वाहने), रोबोटिक्स आणि संरक्षण क्षेत्राला थेट बसू शकतो. याशिवाय, अमेरिकेत औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा (ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएंट्स) 70 टक्क्यांहून अधिक पुरवठा चीन करतो. अशाच इतर अनेक महत्त्वाच्या उत्पादनांचा पुरवठाही चीनकडून केला जातो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) इतिहास पाहता जनतेने सरकारच्या या रोखठोक भूमिकेकडे थोडे सावधगिरीने पाहणेच अधिक योग्य ठरेल. कारण, गेल्या एका दशकात आपले सरकार तेलाच्या बाबतीत अनेकदा अमेरिकेच्या दबावापुढे मवाळ झाले आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात FDA ची धडक कारवाई! कोंढव्यात १,१९० किलो बुंदी आणि लाडू जप्त
धाराशिवमध्ये FDA ची धडक कारवाई! ५ लाखांचा तब्बल १,८३० किलो खवा जप्त
नालासोपाऱ्यात ५० ते ६० जणांचा जमाव चाळीत घुसल्याचा आरोप! धारदार शस्त्रांसह तोडफोड
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




