
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेला विठ्ठलवाडी ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंतच्या रस्त्याचा वाहतूक पोलिसांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे वाहनचालकांकडून पर्यायी रस्त्याचा अपेक्षित वापर होत नसल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करून सिंहगड रस्त्यावर येताना रस्त्यामधील दुभाजक काढून टाकावेत, अशी मागणी महापालिकेकडून वाहतूक पोलिसांना करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत फनटाइम चित्रपटगृह ते राजाराम पूल या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम होत नाही, तोपर्यंत दुभाजक काढणार नाही, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे वाहनचालकांना काही मीटर अंतराचा ‘वळसा’ मारावा लागत असल्याने या रस्त्याचा अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीही कायम राहिली आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विठ्ठलवाडी ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंत पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या पथ विभागाकडून सर्व कामे पूर्ण करण्यात आली असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असा दावा केला जात होता. मात्र रस्ता वाहतुकीला खुला करूनही सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कायम असल्याची वस्तुस्थिती असून त्याला वाहतूक पोलिसांची आडमुठी भूमिका जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विठ्ठलवाडी ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंतचा रस्ता अनेक वर्षे या ना त्या कारणांनी रखडला होता. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नसताना राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यान उड्डाणपुलाचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. पर्यायी पाच रस्ते कागदावर राहिले असतानाच उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. एक ते दीड किलोमीटर अंतरासाठी वाहनचालकांना ४५ मिनिटांचा प्रवास करावा लागत आहे. त्यातच रखडलेला पर्यायी मार्गाचा वापर अपेक्षित होत नसल्याने सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कायम राहिला आहे.विठ्ठलवाडीहून पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंत आल्यानंतर स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांना काही मीटर अंतराचा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या सोईसाठी पु. ल. देशपांडे उद्यानासमोरील दुभाजक काढून टाकावा आणि तेथे वाहतूक नियंत्रक दिवे लावण्याची मागणी पथ विभागाने वाहतूक पोलिसांना केली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी ती अमान्य केली असून उड्डाणपुलाचे काम होत नाही तोपर्यंत दुभाजक काढता येणार नाही, असे महापालिकेला कळविले आहे. त्यामुळेच वाहनचालकांकडून रस्त्याचा वापर होत नसल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात आला आहे.
सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. डोणजे, खडकवासला, किरकिटवाडी, नांदेडसिटी, धायरी, वडगांव, सनसिटी, माणिकबाग येथे जाण्यासाठी सिंहगड रस्ता एकमेव रस्ता आहे. सध्या विठ्ठलवाडीपासून फनटाइम चित्रपटगृहापर्यंतच्या कालवा रस्त्याचा वापर वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
पर्यायी रस्त्यांसाठीच्या तरतुदी
सिंहगड रस्ता उड्डाणपूल- ४० कोटी
लगड वस्ती ते सावित्री गार्डन- ५५ लाख
राजयोग सोसायटी ते लगड वस्ती- ५० लाख
इंडियन ह्यूम पाइप ते सर्वेक्षण क्रमांक ३२- १ कोटी
धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती रस्ता – ५५ लाख
विठ्ठलवाडी ते पु. ल. देशपांडे उद्यान या पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला आहे. मात्र वळसा घ्यावा लागत असल्याने त्याचा वापर कमी होत आहे. त्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविण्यात आले आहे.- व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग, महापालिका
शहर
- पुणे: हडपसर येथील रुग्णालयात बॉम्ब सापडल्याने खळबळ; तपास सुरू
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
महाराष्ट्र
- पवनराजे निंबाळकर हत्याकांड: २० वर्षांच्या कायदेशीर लढाईचा संपूर्ण इतिहास
- पुणे: हडपसर येथील रुग्णालयात बॉम्ब सापडल्याने खळबळ; तपास सुरू
- बुलढाण्यात बापानेच संपवलं मुलीचं आयुष्य! हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; आरोपी पिता आणि मुलाला अटक
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
गुन्हा
- पवनराजे निंबाळकर हत्याकांड: २० वर्षांच्या कायदेशीर लढाईचा संपूर्ण इतिहास
- पुणे: हडपसर येथील रुग्णालयात बॉम्ब सापडल्याने खळबळ; तपास सुरू
- बुलढाण्यात बापानेच संपवलं मुलीचं आयुष्य! हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; आरोपी पिता आणि मुलाला अटक
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
राजकीय
- मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा; तेलंगणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




