संजय कपूर, प्रिया सचदेव आणि करिश्मा कपूरImage Credit source: Instagram
बिझनेसमन आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व दिवंगत पती संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीप्रकरणी सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. न्यायालयाने संजय कपूरच्या कुटुंबीयांना सल्ला दिला की कौटुंबिक भांडणं रस्त्यावर आणू नका, उलट ते शांततेनं आणि सामंजस्यानं सोडवण्याचा प्रयत्न करा. संजय कपूरची आई राणी कपूर यांच्या याचिकेवर ही सुनावणी सुरू होती. कोर्टाने राणी कपूर, संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर, पूर्व पत्नी करिश्मा कपूर आणि त्यांच्या मुलांना सांगितलं की, ही संपत्ती मेहनतीची असून त्याकडे आशीर्वाद म्हणून पहावा.
‘IANS’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने हे स्पष्टपणे म्हटलंय की, ही सर्व संपत्ती आणि बिझनेस हे दुसऱ्यांच्या मेहनतीचं फळ आहे आणि तुमच्यासाठी ते आशीर्वादासारखं आहे. त्यामुळे या संपत्तीकडे आणि बिझनेसकडे आशीर्वादाप्रमाणेच पहावं. याचं तुम्ही अभिशापात रुपांतर करू नका. कोर्टाने यावेळी असाही सल्ला दिला की कौटुंबिक नात्यांचा आदर करण्याचा आणि या वादाला शांततेनं सोडवण्याचा प्रयत्न करा. राणी कपूर यांच्या फॅमिली ट्रस्टशी संबंधित या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने चर्चा आणि सामंजस्याने प्रकरण सोडवण्याचा सल्ला दिला. कोर्टाने इथे स्पष्ट म्हटलंय की, भांडणतंट्याने इथे गोष्टी आणखी चिघळू किंवा शकतात. त्यामुळे यातून मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी मिळून करावा.
या सुनावणीदरम्यान संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूरने सासू राणी कपूर यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली. त्यावर कोर्टाने नोटीस जारी करत सर्व पक्षकारांना उत्तर देण्याची संधी दिली आहे. चार आठवड्यांत सर्व पक्षकारांनी आपापली उत्तरं कोर्टात दाखल करावीत, असं सांगण्यात आलं. याप्रकरणाची पुढील सुनावणी ही 23 मार्च रोजी होणार आहे.
संजय हा खूप मोठा उद्योगपती होता. तो सोना कॉमस्टार या कंपनीचा तो अध्यक्ष होता. जून महिन्यात पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झालं होतं. संजयची संपत्ती तब्बल 30 हजार कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. 2016 मध्ये करिश्मा कपूरला घटस्फोट दिल्यानंतर संजयने 2017 मध्ये मॉडेल प्रिया सचदेवशी लग्न केलं होतं. संजयच्या निधनानंतर करिश्माने तिच्या दोन मुलांच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




