आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन झाले. नफिसा बेगम या अनेक वर्षांपासून सिल्लोडच्या सक्रिय राजकारणात होत्या. मात्र, त्यांचे निधन नेमके कोणत्या कारणाने झाले, याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही. नफिसा बेगम या सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. नफिसा बेगम यांच्या निधनाने कुटुंबियांना अत्यंत मोठा धक्का बसला. नफिसा बेगम यांच्या निधनाने सत्तार कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली. फक्त एका बड्या राजकीय नेत्याची पत्नी म्हणून त्यांनी कधीही काम केले नाही. त्यांनी कायमच आपली वेगळी ओळख निर्माण केली. सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी अनेक मोठी निर्णय घेतली. शहराला वेगळी ओळख मिळवून देण्याकरिता विकास कामांवर त्यांनी अधिक भर दिला.
नगराध्यक्षपदाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक समस्या सोडवण्यावर अधिक भर दिला. जास्तीत जास्त वेळ लोकांच्या समस्या सोडवण्याकरिता त्यांनी दिला. नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर सिल्लोड येथे अंत्यसंस्कार केले जातील. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या सिल्लोड येथील निवासस्थानी ठेवले जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये नफिसा बेगम यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार केले जातील. आमदार अब्दुल सत्तार यांचे मोठे कुटुंब असून मुले, सुना असा मोठा परिवार त्यांचा आहे. राज्यातील काही बडे नेते देखील सिल्लोडमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीनंतर भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात सत्तास्थापनेसाठी अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतला होता.
अब्दुल सत्तार हे मराठवाड्यातील मोठे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांना स्थान मिळू शकले नाही. अब्दुल सत्तार यांच्याऐवजी संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात संधी दिली. यादरम्यान अब्दुल सत्तार हे नाराज असल्याचेही सांगितले जात होते.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




