17 Feb 2026 08:36 AM (IST)
राहुल गांधी यांच्या विरोधातील स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणाची आज सुनावणी
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी सावरकरांचे वंशज सत्यकी सावरकर यांनी हा खटला दाखल केला आहे. आजच्या सुनावणीत राहुल गांधी यांच्या वकिलाकडून सरतापास करण्यात येणार आहे. फिर्यादी असलेल्या सात्याकी सावरकर यांच्या वकिलाकडून राहुल गांधींच्या बाजूचा सरतपास यापूर्वी पूर्ण झाला आहे.
17 Feb 2026 08:26 AM (IST)
शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांचे सलग तीन महिन्यांचे पगार थकले
शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांचे सलग तीन महिन्यांचे पगार थकले आहेत. पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. लवकर पगार न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ७ सप्टेंबर २०२५ पासून प्रसादालय बंद आहे. सेवा नियम आणि पगार निश्चितीची तपासणी लेखा अधिकाऱ्यांकडून सुरू असून अडचणी दूर करून लवकरच पगार आणि प्रसादालय सुरू करू अशं प्रशासक अतुल चोरमारे म्हणाले आहेत.
17 Feb 2026 08:17 AM (IST)
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडियाला तीन मार्चपर्यंत मुदतवाढ
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडियाला तीन मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुंढव्यातील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये आणि दंडाची रक्कम वसुलीसाठी दिलेली दोन महिन्यांची मुदत संपुष्टात आली आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आता विभागाने पंधरा दिवसांची मुदत कंपनीला वाढवून दिली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी तीन मार्चला होणार आहे.
17 Feb 2026 08:16 AM (IST)
तपोवन वृक्षतोड प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी
नाशिकमधल्या तपोवन वृक्षतोड प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील अंतरिम अर्जावर महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. नाशिक महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभाग आज उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसेकडून वकील नितीन पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
17 Feb 2026 08:15 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आज पुण्यात आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आज पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश NSUI कडून पुण्यात मोदींच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. एपस्टीन फाईल् मध्ये मोदींचं नाव आल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश NSUI आंदोलन करणार आहे.
17 Feb 2026 08:13 AM (IST)
अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन
शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन झालं आहे. नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. नफिसा या सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




