नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकांना खूपमहत्त्व दिले गेले. या निवडणुकांत एखाद्या पक्षाचा मोठाविजय होणे किंवा पूर्ण सफाया होणे म्हणजे जनतेमधीलत्याचा पाठिंबा वाढतोय किंवा घटतोय असा याचाअजिबात अर्थ होत नाही. तरीही राजकारणात अनेकनिकालांना प्रतीकात्मक महत्त्व असते. नुकतेच यूपी,बिहार, महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये अनुक्रमे 11, 8, 5 आणि4 मतदारसंघात मतदान पार पडले. एमएलसी निवडणुका या राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहासाठी म्हणजेच विधान परिषदेसाठी असतात. देशातील 28 राज्यांपैकी केवळ 6 राज्यांमध्येच विधानपरिषद आहे वरील 4 राज्यांव्यतिरिक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. हे कायमस्वरूपी सभागृह आहे. ते कधीहीबरखास्त होत नाही. या सभागृहाच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एक-तृतीयांश सदस्य निवृत्त होतात. त्यामुळे या निवडणुका एकाच वेळी नहोता वेगवेगळ्या अंतराने होतात. विधान परिषदेचे सदस्य पाच मार्गांनी सभागृहात पोहोचतात. एक-तृतीयांशसदस्यांची निवड आमदार करतात. एक-तृतीयांशसदस्यांची निवड नगरपालिका व जिल्हा परिषदांसारख्यास्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी करतात. तर 1/12भाग पदवीधरांकडून व 1/12 भाग शिक्षकांकडून निवडलाजातो. उर्वरित 1/6 सदस्यांचे नामनिर्देशन राज्यपालविविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींमधून करतात. यात गुप्तमतदान पद्धतीचा वापर केला जातो. मतदार उमेदवारांनात्यांच्या पसंतीक्रमानुसार प्राधान्य देतात. मतमोजणी ठरवूनदिलेला कोटा, अतिरिक्त मते किंवा बाद झालेल्याउमेदवारांच्या मतांच्या हस्तांतरणाच्या आधारे पुढे सरकते.या निवडणुकांमुळे कोणत्याही पक्षाच्या एकंदरीतकामगिरीवर काय परिणाम होईल याचा थेट अंदाज लावतायेत नाही. नागपूरमध्ये अवघी एक जागा जिंकूनही काँग्रेसपक्ष बातम्यांमध्ये राहण्यात यशस्वी ठरला. पण हात्यांच्यासाठी एक धडाही असायला हवा. कारणकर्नाटकसारख्या राज्यात स्वतःची सत्ता आहे. तिथेपक्षाला आपले खातेही उघडता आले नाही. भाजप-जद(धर्मनिरपेक्ष) आघाडीने सर्व चार जागांवर विजयमिळवला. सत्ताधारी पक्षाकडे सरकारी यंत्रणा,कार्यकर्त्यांचे जाळे व स्थानिक लोकांशी संपर्क असतो.त्यामुळे तो किमान एक-दोन जागा तरी नक्कीच जिंकेलअशी अपेक्षा असते. तसे न होणे हे बंगळुरूमधीलसरकारची सत्ता आणि तळागाळातील पक्षाचीसंघटनात्मक उपस्थिती याच्यात मोठी दरी असल्याचेस्पष्ट संकेत देते. काँग्रेसचे नेते हा निकाल म्हणजेसरकारच्या कामगिरीवर दिलेला कौल नाही असे नक्कीचम्हणू शकतात. पण पक्षाची सत्ता राज्यात सर्वच जागांवरपराभव होणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.भाजपसाठी 28 पैकी 13 जागा जिंकण्याचा आनंद साजराकरणे रास्त आहे. हे विविध राज्यांमधील पक्षाची मजबूतसंघटनात्मक ताकद दर्शवते. पण एक गोष्ट पक्षासाठीधक्का मानली जाऊ शकते. उपलब्ध आकडेवारीनुसारसुशिक्षित मतदार भाजपला मतदान करत आले आहेत.मात्र, दीर्घकाळापासून सुशिक्षित आणि शहरी मतदारांवरविश्वास असणाऱ्या पक्षासाठी पदवीधर मतदार संघातआपली पकड ढिली झाली आहे हे पाहणे नक्कीच चिंतेचेठरेल. यूपी आणि विशेषतः वाराणसीमधील पराभवपक्षासाठी धोक्याची घंटा ठरायला हवी. कारण पुढील वर्षीतिथे निवडणुका आहेत व लोकसभा निवडणुकीतीलयूपीच्या निकालांमुळे भाजपचे मोठे नुकसान झाले होते.वाराणसी हा पंतप्रधानांचा स्वतःचा मतदारसंघ आहे.त्यामुळे या निवडणुकांत फार काही पणाला लागले नसलेतरीही, या पराभवाचे प्रतीकात्मक महत्त्व नाकारणे कठीणआहे. बिहारमध्ये ‘जन सुराज'' पक्षाचे खाते उघडणे तिथेत्यांची वाढती संघटनात्मक ताकद दर्शवते. त्यांचेसंस्थापक प्रशांत किशोर यांनी भाजपचे वर्चस्व असलेल्याबांकीपूर पोटनिवडणुकीत विजय मिळवला. खरे तरभाजपने 1995 पासून ही जागा कधीही गमावली नव्हती. 2025 च्या बिहार विधानसभेत जन सुराजला एकही जागाजिंकता आली नव्हती. पण तीन महिन्यांत मिळालेले हेदोन विजय हेच दाखवतात की, हा पक्ष आपल्या प्रचाराचेमतांमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी होत आहे. अर्थात, हेयश लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांत मिळवतायेईल का? येथे त्यांना मोठ्या व विविध मतदारापर्यंतपोहोचावे लागेल. हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एमएलसी निवडणुकीचे निकाल राष्ट्रीयकिंवा राज्य पातळीवरील कोणत्याहीट्रेंडची पुष्टी करत नसले तरी भारतीयराजकारणात सध्याच्या घडामोडी पाहताकाँग्रेसला अजून खूप परिश्रम करावेलागतील. भाजपला दक्ष राहावे लागेल.जन सुराज पक्षाकडे उत्साही असण्यासाठीपुरेशी कारणे आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
- नाशिक: मालेगाव तालुक्याच्या घशाला पडली कोरड; १२५ गावे आणि ५८ वाड्यांना पाणीटंचाईची तीव्र धग
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: जिल्हा बँक निवडणुकीत खासदार नीलेश लंके विजयी, आमदार पराभूत
- सिंधुदुर्ग: अभिमानास्पद क्षण! आचऱ्याच्या शिल्पा गावकर-डोंगरेची राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
- पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव
- सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ९७.९२ टक्के चुरशीने मतदान! खंडाळ्यात तुफान राडा, उद्या निघणार निकाल
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा





























Subscribe to my channel




