
बुलढाणा: गेल्या ३७० वर्षांपासूनची प्रदीर्घ परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध 'घटमांडणी'चे भविष्य आज जाहीर करण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आलेल्या या घटमांडणीच्या निरीक्षणातून यंदाचा पाऊस, पीक-पाणी, देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती तसेच जागतिक संघर्षाबाबत महत्त्वाची भाकिते वर्तवण्यात आली आहेत.
हवामान आणि पावसाचा अंदाज:
भेंडवळच्या अंदाजानुसार, यंदा जून महिन्यात मुसळधार पाऊस पडेल, ज्यामुळे अनेक ठिकाणी महापुराचे संकट ओढवू शकते. मात्र, जुलैमध्ये पाऊस सर्वसाधारण असेल, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.
शेती आणि पिकांची स्थिती:
भरघोस पिके: यंदा कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल.
मध्यम पिके: ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, वाटाणा आणि जवस ही पिके सर्वसाधारण येतील.
पिकांवर रोगराई पडण्याचे प्रमाण अधिक असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
देशाची राजकीय आणि आर्थिक स्थिती:
भविष्यावाणीनुसार, देशाची आर्थिक स्थिती यंदा फारशी मजबूत नसेल. राजकीय क्षेत्रात 'राजा कायम असेल' (सत्ताधारी कायम राहतील) असे संकेत मिळाले आहेत. मात्र, देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर मोठा ताण असेल आणि सीमांवर तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. तसेच इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरही अशांततेचे सावट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुलढाणा, खान्देश, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील हजारो शेतकरी या भविष्यवाणीच्या आधारे आपल्या शेतीचे नियोजन करत असतात. पुंजाराजी महाराज आणि वाघ घराण्याद्वारे ही परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




