भाजपची एकनिष्ठ मतपेढी आज पेट्रोलमधीलइथेनॉलच्या मिश्रणामुळे संतापली आहे. गेल्या काहीमहिन्यांत मला अनेक लोक भेटले. विमानतळावर,लग्नसमारंभात, हॉटेलच्या लॉबीमध्ये, पाहुणे आणिटॅक्सीचालकांच्या रूपात भेटलेले हे लोक नाराज दिसले.त्यांचा राग असा होता की, ते आपल्याला जबरदस्तीनेइथेनॉल मिसळलेले पेट्रोल (ईबीपी) कसे देऊ शकतात? ढोबळमानाने या लोकांचे असे प्रश्न आहेत की, यातूनआमचा काय फायदा होणार? आम्ही किंमत तर तेवढीचदेऊ, पण मायलेज मात्र कमी मिळेल. यासोबतच गाडीचेइंजिनही खराब होईल. एकीकडे आम्ही ईएमआयनियमितपणे भरत असू आणि यातून देशाला काय फायदाहोणार? जर काही फायदा होणार असेल, तर तोआम्हाला का सांगितला जात नाही? आम्हाला पर्यायनिवडण्याची संधी का दिली जात नाही? आम्हालासांगितले जात आहे की, हे वापरा किंवा पायी चाला.आमच्या त्रासातून कुणाचा फायदा होत आहे? हे योग्य आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. सरकारकडे याचीउत्तरे असायला हवीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनामतदारांना विश्वासात घेण्याची कोणतीही काळजी दिसतनाही. ग्राहकांना आधी या बदलासाठी तयार करण्याचाकुणीही प्रयत्न केला नाही. आता मंत्र्यांना पुढे करूनफायदे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.पण या गोष्टींचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. 2014 नंतर मध्यमवर्ग ही भाजपची भक्कम मतपेढीराहिली आहे. हा वर्ग त्यांच्याप्रति इतका एकनिष्ठ राहिलाआहे की, इंधनाच्या किमती वाढूनही त्यांनी त्यांनाचमतदान केले. कच्च्या तेलाच्या किमती घसरूनहीसरकारने उत्पादन शुल्क वाढवून स्वतःच फायदालाटला, तेव्हाही त्यांनी सरकारला माफ केले. त्याभरघोस फायद्याचा वापर गरिबांना मोफत धान्य आणिइतर थेट लाभ वाटण्यासाठी केला गेला. याला मी ‘रॉबिनहूड बनण्याचा प्रयत्न’ असे म्हणतो- मध्यमवर्गाकडून वसूल करा, गरिबांमध्ये वाटा आणि श्रीमंतांची पर्वा करू नका. जर ‘सेक्युलर’ पक्ष मुस्लिममते आपल्यासाठी पक्की मानून चालत असतील, तर भाजपही विशाल मध्यमवर्गाला स्वतःसाठी पक्के मानू शकतो. या वर्गाने इंधनाच्या वाढलेल्या किमती यासाठी स्वीकारल्या, कारण ते हिंदुत्ववादी राष्ट्रवादाच्या घोषणेवर विश्वास ठेवतात. पण हे मतदार आज नाराज आहेत. ज्या पक्षाला या गोष्टीचा अभिमान आहे की त्यांचे नेते कठोर निर्णयही मतदारांकडून स्वीकारून घेण्याची क्षमताठेवतात, मग ती नोटाबंदी असो किंवा कोविडदरम्यान देशभरात अचानक लॉकडाऊन करण्याचा निर्णय असो,त्या पक्षासाठी ही आश्चर्याची बाब आहे. पण ‘ईबीपी’च्या बाबतीत कृतीचे आवाहनही केले गेले नाही. असे वाटतेकी कुणाला तरी अचानक काहीतरी सुचले आणि2013-14 मध्ये पेट्रोलमध्ये जे 1.56 टक्के मिश्रण केलेजात होते, ते गुपचूप वाढवून 20 टक्के केले गेले आणिआता ते 30 टक्के करण्याबाबत बोलले जात आहे. पणयात दोन अडचणी आहेत. एक म्हणजे ग्राहक संतापलेआहेत आणि त्यांची संख्या मोठी आहे. दुसरी अडचणम्हणजे जास्त इथेनॉल उपलब्ध नाही. जोपर्यंत तुम्हीतांदळाच्या सुरक्षित साठ्यात हात घालत नाही, तोपर्यंतमिश्रणाचे हे प्रमाण टिकवून ठेवता येईल इतकेही तेउपलब्ध नाही. याशिवाय, लोक आणखी जास्त भेसळस्वीकारणार नाहीत. कागदावर आयात केलेल्याइथेनॉलऐवजी देशी इथेनॉलचा वापर करणे योग्य वाटते.पण तुमच्याकडे इथेनॉलचा असा कोणताही मोठा स्रोतनाही की तुम्ही ड्रिल करून ते काढू शकाल. तुमच्याशेतकऱ्यांना त्या स्रोताची- म्हणजे ऊस, मका किंवाभाताची शेती करावी लागेल. याच्या वापराचा विचारतेव्हा आला होता, जेव्हा साखरेचे अतिरिक्त उत्पादन होतहोते. साखर कारखाने आपला पैसा वसूल करूनशेतकऱ्यांची थकबाकी देऊ शकत होते. हे इतकेउत्साहवर्धक होते की, साखर कारखान्यांना उसाचा रसइथेनॉलच्या उत्पादनासाठी देण्याची परवानगी देण्यातआली. बाजारात साखर मुबलक प्रमाणात पडून होती.पण शेतीशी संबंधित अनिश्चिततांचा कुणीही विचारकेला नाही. उदाहरणार्थ धान्याच्या बाजारपेठा, पावसाचीअनिश्चितता, कीटकांचा प्रादुर्भाव. एकाच वर्षात ऊसअतिरिक्त उत्पादनाकडून टंचाईकडे गेला. या हंगामाची सुरुवात साखरेच्या साठ्यातील 50 लाखटनांच्या घसरणीने झाली. पूर्वीचा आधार 34.3 मेट्रिक टनहोता, तो आता घसरून 28 मेट्रिक टनांवर पोहोचला आहे.याचा परिणाम असा झाला की, साखरेची किंमत सुमारे 50टक्क्यांनी वाढली. अपेक्षेप्रमाणे, जुनीच कथा पुन्हा घडतआहे: साठ्यावर नियंत्रण ठेवा, ‘साठेबाजी आणिनफेखोरी’वर कारवाई करा, निर्यातीवर बंदी घाला आणिकरमुक्त आयातीसाठी मार्ग मोकळा करा. पण सणासुदीचेदिवस जवळ येत असताना, साखर महागणे सहन होऊशकते का? इथेनॉलच्या खरेदीत बेसुमार वाढ होत राहिली-2013-14 मधील 38 कोटी लिटरवरून वाढून या वर्षी 1,200कोटी लिटरची खरेदी झाली. रिफायनरींनी मक्याकडे मोर्चावळवला. तेव्हा मक्याच्या किमतीतही सुमारे 50 टक्क्यांचीवाढ झाली. यामुळे पोल्ट्री आणि मांसाच्या किमतीहीवाढतात, कारण त्यांना मका लागतो. आता भाताकडे हातपुढे केला जात आहे. आधी तुकडा तांदूळ आणि नंतरअतिरिक्त तांदळाचा नंबर आला. या वर्षी इंधनासाठी 72लाख टन तांदूळ बाजारातील किमतीपेक्षा निम्म्या किमतीतवितरित केला गेला. ‘ईबीपी’ची कल्पना चांगली असूशकते. पण ती शेतीवर आधारित आहे. त्यामुळे याचीअंमलबजावणी करण्यापूर्वी तीन-चार वर्षे पूर्वतयारीकरायला हवी होती. शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीचे पीकबदलण्यासाठी तयार करायला हवे होते. त्यांच्यासाठीबाजारपेठ निर्माण करण्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचीटंचाई भासणार नाही, अशी व्यवस्था करायला हवी होती.जेणेकरून आपण ‘अन्न विरुद्ध इंधन’ या जाळ्यातअडकणार नाही. आणि शेवटी, ग्राहकांना इथेनॉलयुक्तपेट्रोल वापरण्यासाठी राजी करायला हवे होते. पण आज हेपरिणाम समोर आले आहेत- साखरेची टंचाई निर्माण झालीआहे, परकीय चलनाची स्थिती वाईट आहे, सण जवळआलेले असताना महागाई वाढली आहे आणि तुम्हीतांदळाचा सुरक्षित साठा ‘ईबीपी’ला निम्म्या किमतीत देतआहात. अशा परिस्थितीत एक तर इथेनॉल मिसळण्याचेप्रमाण कमी करून 10 टक्के केले जावे, किंवा ग्राहकांसमोरपर्याय ठेवला जावा. लक्षात ठेवा, भाजपचे एकनिष्ठ मतदार संतापले आहेत!(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) याची पूर्वतयारी गरजेची होती...इथेनॉलची कल्पना चांगली असू शकते. पण तीशेतीवर आधारित आहे. याची अंमलबजावणीकरण्यापूर्वी तीन-चार वर्षे पूर्वतयारी करायला हवीहोती. शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीचे पीकबदलण्यासाठी तयार करायला हवे होते.जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही,अशी व्यवस्था त्यांच्यासाठी करायला हवी होती.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




