बारामती जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला थोड्या वेळात सुरूवात!

बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे बारामती तालुक्यात शांततेचे आणि काहीसे दुःखाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १२ गणांसाठी ही मतमोजणी होत आहे.

राज्याचे लक्ष खास करून बारामतीकडे लागले आहे, कारण पवार आणि पुणे हे एक समीकरण नेहमीच राहिले आहे. मात्र, यंदाचे चित्र काय असेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणूक पार पडत असल्याने, सुरुवातीचा उत्साह नंतर शोकात बदलला. ज्या दिवशी त्यांचे निधन झाले, त्याच दिवशी ते चार जाहीर सभा घेणार होते.

निवडणुकीवर दुःखाचे सावट पसरल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली. मागील निवडणुकीत ७१% मतदान झाले होते, तर यंदा केवळ ५४% मतदान नोंदवले गेले आहे. स्थानिक प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी या संदर्भात माहिती दिली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *