पुण्यातील सातारा रस्त्यावर एसटीचा ब्रेक फेल.. पाच ते सात गाड्यांना दिली धडक:

पुण्यातील सातारा रस्त्यावर हॉटेल रविकांत जवळ अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे एसटीने पाच ते सात गाड्यांना धडक दिली. यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चारचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच एसटीही फुटली आहे.

शंकर महाराज उड्डाणपुलावर ही दुर्घटना समोर आली आहे.

गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ धाव घेत वाहतूक मार्गी लावण्यास सुरुवात केली. या दुर्घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

अपघातात तीन जण जखमी झाल्याचं कळतंय. तर, जखमींना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस व भारती विद्यापीठ पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *