पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:धार्मिक विचारांचा प्रसार आता‎ स्वत:च्या आचरणातून करावा

दुष्टपणा, निर्दयता, कठोरपणा यांसारखे दोष स्पष्टपणे दिसतात.‎इतरांविषयी प्रेमळ राहावे, करुणा असावी, असे आपल्याला शिकवले‎जाते आणि योग्य मार्गही तोच आहे. परंतु बारकाईने पाहिले तर‎कधीकधी करुणा दाखवूनही परिणामात चूक होते. करुणा नेहमीच‎हितकारक असते असे नाही. किमान मुलांचे संगोपन करताना‎पालकांना आपल्या करुणेवर कठोर आवरण घालावे लागेल. मुलांवर‎अतिशय करुणा केली, दयेची मर्यादा ओलांडली, लाड-कौतुक केले,‎ते भविष्यात महागात पडेल. येथे काही कठोरपणा, निर्दयता आणावी‎लागते. आज आपली मुले हळूहळू पूर्णपणे भौतिक जीवनशैलीत‎उतरतील. त्यांच्यासाठी मोठी माणसे बोलत असताना ऐकून घेणे किंवा‎मोठ्यांच्या पाया पडणे ही परंपरा आश्चर्यकारक ठरेल. हे सर्व काही‎दिवसांत एखाद्या स्वप्नासारखे होईल. त्यामुळे मुले रमतील अशा‎जीवनशैलीत धार्मिक विचारांचा प्रसार करणे हे आमच्यासारख्या‎लोकांसाठी मोठे आव्हान असेल. हा प्रसार स्वत:च्या आचरणातून‎करायला हवा. या शेवटच्या पिढीने नवीन पिढीला काहीतरी मौल्यवान‎देऊन जावे.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *