नरेंद्र मोदी यांचा कॉलम:आपली राज्यघटना देशासाठी पथदर्शक

‎‎‎‎‎‎‎‎‎‎26 नोव्हेंबर 1949 रोजी आजच्या दिवशी संविधान‎सभेने राज्यघटनेचा स्वीकार केला होता. आज आपण डॉ.‎राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान‎सभेच्या सर्व सदस्यांचे स्मरण करतो. भारतासारख्या‎विविधतेने नटलेल्या देशात संविधानाचा गजर संसद‎आणि न्यायालयांच्या पलीकडे पोहोचणे अत्यंत गरजेचे‎आहे. जनसामान्यांच्या चेतनेशी, विशेषतः तरुणांशी‎संविधानाची नाळ अधिक घट्ट जोडली जावी, असा‎आमचा प्रयत्न राहिला. याच विचाराने एका दशकापूर्वी‎आमच्या सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन‎म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.‎ आपले संविधान माझ्यासह कोट्यवधी भारतीयांच्या‎जीवनप्रवासाचा अविभाज्य भाग आहे. एका सामान्य‎कुटुंबात जन्मलेला मुलगा - वारशाने कोणताही‎विशेषाधिकार किंवा सुविधा मिळाली नाही तो एक दिवस‎जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सेवेची जबाबदारी‎सांभाळू शकतो - हे आपल्या संविधानाच्या असामान्य‎शक्तीचे प्रमाण आहे. आपण विनम्र प्रयत्नांनी‎संविधानाला अधिक सशक्त बनवून कृतज्ञतेचे हे ऋण‎फेडण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक बँकेचा ताजा‎अहवाल सांगतो की, भारतातील सुमारे 50 कोटी लोक‎अत्यंत दारिद्र्यातून बाहेर पडले आहेत. पिढ्यान‌्पिढ्या‎चालत आलेल्या अभावातून मुक्त होऊन आज‎कोट्यवधी माता-पिता मुलांच्या चांगल्या भविष्याचे स्वप्न‎पाहू शकतात. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून‎एखाद्या कुटुंबाला झोपडीतून बाहेर पडून पक्क्या घरात‎गृहप्रवेश करण्याची संधी मिळते. तेव्हा सन्मानाने जीवन‎जगण्याचा संविधानिक संकल्प खऱ्या अर्थाने साकार‎होतो. उज्ज्वला योजना एखाद्या मातेला धुराने भरलेल्या ‎‎स्वयंपाकघरातील त्रासातून मुक्त करते. तेव्हा आपण‎समानता आणि जनकल्याणाच्या आदर्शांना पुढे नेतो. ‎‎आयुष्मान भारतामुळे एखाद्या गरीब कुटुंबाला कर्जाची‎चिंता न करता चांगले उपचार मिळतात. तेव्हा त्यांच्या ‎‎जीवनात सामाजिक न्यायाचा संकल्प साकार होतो. मुद्रा ‎‎योजना आणि पीएम स्वनिधीअंतर्गत छोटे उद्योजक आणि ‎‎फेरीवाल्यांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज मिळते, तेव्हा ‎‎आर्थिक न्यायाची संविधानिक भावना प्रत्यक्षात उतरते. ‎‎डिजिटल तंत्रज्ञान, रुपे कार्ड आणि यूपीआय यांसारख्या ‎‎प्लॅटफॉर्मपर्यंत प्रत्येक नागरिकाची पोहोच होते तेव्हा ‎‎समावेशकतेचा संविधानिक आदर्श साकार होतो.‎आमच्या सरकारने केलेल्या घटनादुरुस्त्यांकडेही याच ‎‎दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते. 101 व्या‎घटनादुरुस्तीमुळे जीएसटीसारख्या मोठ्या सुधारणेचा‎मार्ग मोकळा झाला. त्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती. ‎‎102 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून राष्ट्रीय मागासवर्ग ‎‎आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला. यामुळे‎समाजातील वंचित घटकांचे स्वप्न पूर्ण झाले. आमच्या ‎‎सरकारच्या 103 व्या घटनादुरुस्तीचेही लोकांनी कौतुक‎केले. याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10‎टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. आपल्या‎इतिहासातील काही प्रसंग नीट लक्षात घ्यावेत.‎संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी होती त्याच लोकांनी‎संविधान कमकुवत करण्याचा मार्ग निवडला. दुर्दैव पाहा‎की याच लोकांना पाच दशकांपर्यंत देशाची धुरा‎सांभाळण्याची संधी मिळाली. 1951 मध्ये झालेल्या‎पहिल्या घटनादुरुस्तीला यंदा 75 वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी‎देशातील सरकार हे जनतेने निवडून दिलेले नव्हते. त्या‎सरकारने हंगामी संसदेतील बहुमताचा वापर करून‎नागरिकांचे मूलभूत स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. ही‎दुरुस्ती देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काही‎महिने आधीच केली होती. यावरून हे स्पष्ट होते की,‎तिचा उद्देश निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकणे, लोकांच्या‎विरोधाचा आवाज दाबणे हा होता. त्याचप्रमाणे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आणीबाणीच्या काळात केलेल्या 42 व्या‎घटनादुरुस्तीलाही 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या दुरुस्तीने‎न्यायिक पुनरावलोकनाची शक्ती मर्यादित केली. देशाच्या‎संस्थांमधील अधिकारांचे संतुलन मूलभूतरीत्या बदलून‎टाकले. मी तरुणांना असाही आग्रह करेन की त्यांनी 38‎व्या आणि 39 व्या घटनादुरुस्तीचाही अभ्यास करावा.‎यातून त्यांना समजू शकेल की सत्तेची लालसा असलेले‎सरकार कोणत्या थराला जाऊ शकते. निवडून आलेली‎राज्य सरकारे बरखास्त करण्यासाठी कलम 356 चा‎गैरवापर हादेखील आपल्या इतिहासातील एक‎चिंताजनक अध्याय आहे. एका राजकीय पक्षाच्या नावावर‎सुमारे शंभर वेळा कलम 356 लादल्याचा विक्रम नोंदवला‎गेला. एका माजी पंतप्रधानांनी तर या बाबतीत‎अर्धशतकही पूर्ण केले आहे. भारतात संविधान आपल्या‎मूळ स्वरूपात आणि मूळ भावनेसह लागू व्हावे, अशी‎घटनाकारांची अपेक्षा होती. परंतु 70 वर्षांहून अधिक‎काळ कलम 370 आणि 35-ए मुळे जम्मू-काश्मीरमध्ये‎संपूर्ण संविधान लागू होऊ शकले नाही. तिथे एससी,‎एसटी, ओबीसी आणि महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन‎होत राहिले. 2019 मध्ये या ऐतिहासिक अन्यायाचा अंत‎झाला. दशकानुदशके देशाच्या अनेक भागांत विशेषतः‎आदिवासी भागांत, नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या जोरावर‎सर्वात गरीब व्यक्तीला संविधानाने दिलेल्या हक्कांपासून‎वंचित ठेवले होते. या वर्षी नक्षलवादाच्या उच्चाटनामुळे‎मला विशेष समाधान मिळाले आहे. शस्त्रधारी नक्षलवादी‎संपल्यानंतर आता केवळ वैचारिक नक्षलवादी उरले‎आहेत. ते आजच्या काळातील वास्तवापासून खूप दूर‎आहेत आणि देशाचा विकास-प्रवास रुळावरून‎घसरवण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी‎आहे की विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष ओबीसी‎आरक्षणात कपात करून मुस्लिमांना आरक्षण देऊ‎इच्छितो. आपले संविधान निर्माते विशेषतः डॉ. बाबासाहेब‎आंबेडकर या गोष्टीच्या पूर्ण विरोधात होते. या वर्षाच्या‎सुरुवातीला नारीशक्तीला विधिमंडळ संस्थांमध्ये पुरेसे‎प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने आणलेले विधेयकही‎विरोधी पक्षातील एका प्रमुख पक्षाने मंजूर होऊ दिले नाही.‎पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले की घटनात्मक‎मूल्यांबद्दल त्यांच्या मनात किती कमी आदर आहे.‎ आपल्या घटनात्मक लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका‎स्पष्ट आहे. दुर्दैवाने विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष‎आज ‘विरोधी पक्ष'' असण्यापेक्षा ‘अडथळा पक्ष'' बनत‎चालला आहे. त्यांनी हे समजून घ्यावे की लोकशाही‎प्रक्रियेत अडथळे आणणे, हा आपल्या घटनात्मक‎जबाबदाऱ्या पार पाडण्याचा पर्याय कधीही असू शकत‎नाही.‎ राष्ट्र प्रथम आणि कर्तव्यभावना‎आज भारत एका महत्त्वाच्या वळणावर‎उभा आहे. 2047 पर्यंत विकसित भारत‎घडवण्याच्या आपल्या प्रयत्नांना दोन साधे‎पण शक्तिशाली मंत्र दिशा देऊ शकतात -‎विचारांत ‘राष्ट्र प्रथम’ आणि कृतीमध्ये‎‘कर्तव्यभावना’. या दोन मंत्रांना मार्गदर्शक‎बनवून आपण येणाऱ्या पिढ्यांचे उज्ज्वल‎भविष्य निश्चित करू शकतो.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *