नवनीत गुर्जर यांचा कॉलम:शेवटी आपल्या दिवसाच्या अंगणात‎रात्री कधीपर्यंत उतरत राहतील?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आजची परिस्थिती ही आपल्याच ओठांतून निघालेली‎एक भयानक किंकाळी आहे. ...आणि आपण तुटत‎चाललो होतो, आपण या किंकाळीचेही तुकडे केले.‎जाटांची किंकाळी, ब्राह्मणांची आणि राजपुतांची‎किंकाळी असे म्हणत तिचे नामकरण केले. लेथब्रेज‎नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी पेंडुलमच्या‎मदतीने जमिनीत दडलेल्या शक्तींचा शोध घेतला व ‎‎वेगवेगळ्या शक्ती ओळखण्याचे संकेत निश्चित केले. ‎‎याच लेथब्रेज यांनी विशिष्ट दगडांचीही पाहणी केली. ते ‎‎कधीकाळी प्राचीन युद्धात वापरले गेले होते. त्यांना असे ‎‎आढळून आले की, या दगडांवर द्वेषाच्या खुणा खोलवर ‎‎उमटल्या होत्या. त्यांचा पेंडुलम संकेत देत होता. जे‎त्याने मृत्यूसाठी दिला होता.‎ खरे तर कुणाला तरी जखमी करण्यासाठी वापरला‎जातो तोही दगड असतो आणि महात्मा बुद्धांचे वज्रासन‎बनतो तोही एक दगड असतो. दगड आपल्या रक्तानेही‎भिजू शकतात आणि आपण त्यांना एखाद्या आसनावर‎बसवून त्यांची प्राणप्रतिष्ठाही करू शकतो. वास्तविक‎संपूर्ण राजकारणच दगड बनले आहे. सत्ताधारी काय‎आणि विरोधक काय! सर्वजण आपले राजकारण‎चमकवण्यात गुंतले आहेत. सामान्य माणसाच्या‎भल्याची चिंता ना पूर्वी कुणाला होती, ना आता कुणी‎करत आहे. आपण आजही तसेच आहोत. पैशांची‎आवक नक्कीच काहीशी वाढली आहे. शहरांमध्ये‎आयुष्याचा सूर्य घाबरतच प्रकाशाची खिडकी उघडतो.‎महागाई, हिंसाचाराच्या धुराचे लोट पाहून अंधाराच्या‎पायऱ्या उतरू लागतो. निश्चितच देशवासीयांनी हा प्रश्न‎सर्व जबाबदार लोकांना विचारला पाहिजे की, शेवटी‎अशा प्रकारे आपल्या दिवसाच्या अंगणात रात्री‎केव्हापर्यंत उतरत राहतील? काळ्याकुट्ट इतिहासाच्या‎गालांवरून अश्रू कोण पुसणार? स्वातंत्र्यानंतरच देशाने‎हे चांगलेच ओळखले आहे की पोटाच्या आगीचे दोनच‎पैलू आहेत - एक भट्टी, दुसरी आग. भट्टी म्हणजे संपूर्ण‎देश. आणि आग तर समर्थ आहेच. तिच्यासमोर‎कुणाचेही काही चालले नाही. ना राज्य सरकारचे, ना‎केंद्राचे. तुलसीदास म्हणून गेले आहेत - ‘समरथ को‎नहीं दोष गुसाईं, रवि पावक सुरसरि की नाईं''‎(सामर्थ्यवान व्यक्तीला कोणताही दोष लागत नाही. ).‎शेवटी कोट्यवधी लोकांना मोफत धान्य मिळूनही ते‎आत्मदहनास का प्रवृत्त होत आहेत? सर्व सोयीसुविधा,‎भेटवस्तू व सवलती असूनही देशातील अनेक लोकांचे‎जगणे का असह्य झाले? त्यांची घरे, जणू स्वतःचाच‎पत्ता विचारत आहेत. अंथरुणांवर सन्नाटा आहे. त्यांचा‎चंद्र म्हणजे पिंपळाचे सुके पान. त्यांच्या रात्री सुंसुं करत‎वाहणाऱ्या वाऱ्यासारख्या भयाण. ...आणि चेहरा जणू‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आभास उरला आहे. कुणाची हिंमत आहे का, की‎कोणतेही सरकार, विरोधक किंवा इतर कुणी जबाबदार‎व्यक्ती आपल्याच शहरात परके झालेल्या या लोकांशी‎जाऊन दोन शब्द बोलतील, जेणेकरून त्यांचे दुःख‎हलके होईल! जिवंत समाजाच्या जिवंत नेत्यांनो, जरा‎अश्रू तर पुसा! भटकणाऱ्या लोकांना काहीतरी निवारा‎तर द्या. असंख्य लोक एखाद्या तंबूत, निवारा केंद्रात ,‎फुटपाथवर अश्रू ढाळत आहेत. आकाशाकडे शून्य‎नजरेने पाहत आहेत. आता तर चंद्रातही भाकरीच‎दिसते! हे नेते कुणाचेच झाले नाहीत, कोणत्या मातीचे‎बनले आहेत? दुर्दैव हे की, यांना निवडून देणारेही‎आपणच आहोत. सातत्याने. अखंडपणे. अडचणी,‎अपमान आणि द्विधा मनःस्थितीला आपणच जबाबदार‎आहोत. हे खरे आहे की शरीर आहे, तोपर्यंत या यातना‎भोगाव्याच लागतील. आणि दुसरा काही उपायही नाही.‎कारण मत देण्याची प्रवृत्ती काही बदलणार नाही!‎गुलजार यांनी याच परिस्थितीवर अत्यंत समर्पक लिहिले‎आहे - "जिस्म सौ बार जले, तब भी वही मिट्टी का‎ढेला।‎ रूह इक बार जलेगी, तो वो कुंदन होगी!’‎ जिवंत समाजाच्या जिवंत नेत्यांनो, जरा‎अश्रू तर पुसा! भटकणाऱ्या लोकांना‎निवारा तर द्या. असंख्य लोक तंबूत,‎निवारा केंद्रात किंवा फुटपाथवर पडून‎आहेत. आकाशाकडे शून्य नजरेने पाहत‎आहेत. आता चंद्रातही भाकरीच दिसते!‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *