राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:क्रिकेट बोर्डाच्या निर्णयांमध्ये‎ अधिक पारदर्शकतेची गरज

‎‎‎‎‎‎‎‎‎‎जातीयवादापासून अलिप्त ठेवता येईल असे जीवनाचे‎कोणतेच क्षेत्र असू शकत नाही का? हा प्रश्न महात्मा‎गांधींनी 1940 मध्ये प्रस्तावित ‘बॉम्बे पेंटांगुलर'' क्रिकेट‎स्पर्धेबद्दल विचारला होता. धार्मिक समुदायांच्या‎आधारावर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या‎कल्पनेमुळे गांधीजी अत्यंत अस्वस्थ होते. प्रसिद्ध ‘बॉम्बे‎क्वाड्रँगुलर'' स्पर्धेची सुरुवात युरोपीय व पारशी‎संघांमधील सामन्याने झाली होती. नंतर त्यात हिंदू व ‎‎मुस्लिम संघांचाही समावेश झाला. ही विभागणी‎संपुष्टात यावी, अशी गांधीजींची इच्छा होती. अखेर‎1946 मध्ये पेंटांगुलर स्पर्धा बंद करण्यात आली.‎ गांधीजींच्या वरील प्रश्नाला सुमारे 86 वर्षे उलटून गेली.‎पण आजही तो प्रश्न तितकाच प्रासंगिक वाटतो. भारतीय ‎‎क्रिकेटच्या मोठ्या यशांपैकी एक यश हे राहिले आहे‎की, ते धार्मिक आणि प्रादेशिक विभाजनांच्या पलीकडे ‎‎जाण्यात यशस्वी ठरले. तरीही मोहम्मद शमी, सरफराज‎खान आणि आता मोहम्मद सिराज यांना संघाबाहेर‎ठेवल्यानंतर मुस्लिम क्रिकेटपटूंसोबत वेगळी वागणूक‎दिली जात असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. हे‎सांगायला मला संकोच वाटत नाही की,‎न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या‎अंतिम अकरा संघातून सिराजला बाहेर ठेवणे हा‎क्रिकेटच्या दृष्टीने संशयास्पद निर्णय होता. ते भारताच्या‎विश्वासार्ह वेगवान गोलंदाजांपैकी एक राहिले आहेत.‎विशेषतः परदेशी परिस्थितीत. त्यांना संघाबाहेर‎ठेवण्याच्या निर्णयावर संघ व्यवस्थापनाने‎क्रिकेटप्रेमींसमोर ठोस स्पष्टीकरण द्यायला हवे. काँग्रेस‎खासदार इम्रान मसूद यांनी म्हटले आहे की, सिराजची‎धार्मिक ओळख हेच त्यांना संघाबाहेर ठेवण्याचे कारण‎आहे. हा एक गंभीर आरोप आहे. त्यासाठी ठोस‎पुराव्यांची गरज आहे. निवडीचा संशयास्पद निर्णय‎आपोआप जातीय निर्णय बनत नाही. बीसीसीआयने या‎प्रकरणातील संशयाची जबाबदारी स्वीकारायला हवी.‎जगातील हे सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अजूनही अत्यंत‎अपारदर्शक पद्धतीने काम करते. एका खेळाडूची‎दुसऱ्याच्या ऐवजी निवड का केली गेली? फॉर्म,‎फिटनेस, कामाचा ताण आणि संघाची रचना याबाबत‎काय विचार केला गेला? शानदार कामगिरीचा विक्रम‎असलेल्या अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर का ठेवले‎जाते? हे असे प्रश्न आहेत. त्यांची अधिक स्पष्ट उत्तरे‎दिली गेली पाहिजेत.‎ स्वतंत्र भारताने क्वाड्रँगुलर आणि पेंटांगुलरच्या जातीय‎मॉडेलपासून जाणीवपूर्वक अंतर राखले. रणजी करंडक‎ही प्रमुख देशांतर्गत स्पर्धा बनली. त्यात संघ धार्मिक‎समुदायांऐवजी राज्यांचे प्रतिनिधित्व करत होते. नंतर‎निवडीची विभागीय प्रणाली आली. ती 1950 च्या‎दशकापासून ते 1970 च्या दशकापर्यंत भारतीय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎क्रिकेटवर प्रभाव गाजवून राहिली. तिचा आधार‎प्रादेशिक प्रतिनिधित्व हा होता. या व्यवस्थेच्या स्वतःच्या‎मर्यादा होत्या. पण धर्म हा संघांच्या बांधणीचा आधार‎राहिला नव्हता. इफ्तिखार अली खान पतौडी यांनी 1946‎मध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले होते. त्यांचे पुत्र मन्सूर‎अली खान पतौडी हे भारताच्या सर्वात आदरणीय‎कर्णधारांपैकी एक बनले. गुलाम अहमद हे प्रतिष्ठित‎कर्णधार होते. मोहम्मद अझहरुद्दीन यांनी अनेक वर्षे‎भारतीय संघाची धुरा सांभाळली. या नियुक्त्या भारताची‎धर्मनिरपेक्ष प्रतिमा दाखवण्यासाठी केवळ प्रतीकात्मक‎म्हणून केल्या गेल्या नव्हत्या. हे गुणवत्तेच्या जोरावर‎संघात स्थान मिळवणारे क्रिकेटपटू होते. झहीर खान,‎इरफान-युसूफ पठाण, मोहम्मद कैफ, मुनाफ पटेल‎यांसारख्या खेळाडूंनीही अत्यंत दिमाखात भारतीय जर्सी‎परिधान केली आहे. धार्मिक ओळखीच्या पलीकडे‎जाऊन ते केवळ एक भारतीय क्रिकेटपटू होते. ही बाब‎देशाचे प्रतिनिधित्व करणारी होती. असेच असायलाही‎हवे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ निवडीचा कोणताही संशयास्पद निर्णय‎आपोआप जातीय निर्णय ठरत नाही.‎तथापि, बीसीसीआयने या प्रकरणातून‎निर्माण झालेल्या संशयाची काहीशी‎जबाबदारी स्वीकारायला हवी. हे बोर्ड‎अत्यंत अपारदर्शक पद्धतीने काम करते.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *