पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मानसिक आरोग्यावर घाला‎पडल्यास नातेसंबंध जपा‎

आजकाल मानसिक आरोग्याबाबत खूप चिंता व्यक्त केली जाते. ती‎व्हायलाच हवी. आपल्या देशात आता लहान मुलांमध्येही मानसिक‎आजाराची लक्षणे दिसतात. अशा वेळी एक प्रयोग करून पाहूया.‎कुटुंबात जास्त विश्वसनीयता आणि एकजुटीची भावना असेल,‎तितकेच सदस्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपल्या कुटुंबात‎‘श्रीमंती'' असो वा नसो, आपण कुटुंबातील ‘महानता'' शोधली‎पाहिजे. आपल्या आयुष्यात सहा नाती महत्वाची असतात. त्याबद्दल‎आपण एकनिष्ठ व विश्वासू राहावे. आई, वडील, भाऊ, बहीण,‎जोडीदार व मित्र. या लोकांमध्ये सर्वोत्तम काय आहे ते शोधा आणि‎त्यांच्याशी घट्ट जोडलेले राहा. या सहा नात्यांत एक नाते वेगळे आहे,‎आणि ते म्हणजे—बहीण! इतर नात्यांच्या तुलनेत तुम्ही तुमच्या‎बहिणीसोबत सर्वाधिक मोकळेपणाने राहू शकता, हे तुमच्या लक्षात‎येईल. बहिणीचे नाते आयुष्याला एक वेगळीच गोडी देते. मानसिक‎आरोग्य धोक्यात असल्यास भाऊ-बहिणीच्या नात्यावर चांगल्या‎प्रकारे काम करा. तुमचे मानसिक आरोग्य आपोआप उत्तम होईल.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *