पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मातृभाषेचे एक रूप सातासमुद्रापारही टिकून आहे

वेगाने बदलणाऱ्या जगात विवाहसंस्कारांची नवनवीन रूपे पाहून आनंद तर होतो, पण चिंताही वाटली पाहिजे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेतील सेंट लुईस शहरात एका विवाहसमारंभात सहभागी होण्याची संधी मिळाली. आयोजकांनी भव्यतेत कोणतीही कमतरता ठेवली नव्हती, परंतु संस्कार जपण्याचे प्रयत्नही केले जात होते. अमेरिकेत होत असलेल्या समारंभात भारतीय संस्कार जपले जात आहेत, ही बाब आपण ऋषी-मुनींची परंपरा विसरलेलो नाही याची आश्वासक खूण होती. पण एक गोष्ट धक्कादायक वाटली. तिथे नाच-गाण्यात मग्न असलेल्या तरुणांपैकी बहुतेकांना नीट हिंदी बोलता येत नव्हते. मात्र हिंदी चित्रपटांतील गाण्यांविषयीचे त्यांचे ज्ञान आणि आवड पाहून मी हिंदीला नमन केले. त्यांना कदाचित अनेक शब्दांचे अर्थ माहीत नसतील, पण हिंदीचे बोल त्यांच्या नसानसांत भिनले होते आणि त्याच उत्साहात ते नृत्य करत होते. आपण नुकताच हिंदी दिवस साजरा केला आहे. माझ्या मनात आपल्या मातृभाषेला नमन करण्याची इच्छा झाली—तुमचे हे रूपही सातासमुद्रापार टिकून आहे.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *