जर एखाद्या कौटुंबिक व्यक्तीला केवळ आपले वजन नियंत्रित ठेवायचे असेल, घरातील रोजची कामे आणि कार्यालयात उत्तम कामगिरी करत दिवसभर चपळ, निरोगी आणि सक्रिय राहायचे असेल, तर त्याला रोजच्या व्यायामासाठी जिमची गरज नाही. कारण जवळची बागच त्याला आवश्यक असलेली सर्व साधने देऊ शकते. असे मी नाही, तर फिटनेस तज्ज्ञ सांगत आहेत. तुम्ही विचार करत असाल की त्यांना जगभरातील बागांमध्ये असलेल्या साधनांबद्दल कसे माहीत? तर याचे उत्तर असे आहे की सर्वांसाठी आवश्यक असलेले एकच साधन म्हणजे बागेतील बाकडा, जो घराजवळील प्रत्येक बागेत असतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की त्याच बाकड्याचा वापर करून उत्तम व्यायाम करता येतो. देशभरातील अनेक बागांमध्ये विनामूल्य वापरता येण्याजोगे आऊटडोअर जिम आणि एअर वॉकर, क्रॉस ट्रेनर, चेस्ट आणि लेग प्रेस यांसारखी अनेक साधने असतात, जी तुमच्या नितंबाचा आकार कमी करण्यास मदत करतात. परंतु बहुतांश बागांमध्ये फक्त बसण्यासाठी बाकडे असतात आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की त्यांचाच उपयोग वर्कआऊट मशीन म्हणून केला जाऊ शकतो. जर तुम्ही इन्स्टाग्रामसारख्या सोशल साइट्स पाहिल्या तर तिथे हजारो रील्स मिळतील, ज्यामध्ये लोक व्यायामासाठी बागेतील बाकड्याचा वापर करत आहेत. मध्यमवयीन लोकांवर झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की आठवड्यातून दोन वेळा आऊटडोअर सेशन केल्याने 8 आठवड्यांनंतर शारीरिक रचना आणि एकूणच शारीरिक आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. तर 11 अभ्यासांच्या समीक्षणात असे आढळून आले की आऊटडोअर पार्क सेशन्समुळे कार्डिओ फिटनेस आणि ताकद वाढते. मानसिक आरोग्य आणि कोलेस्टेरॉलची पातळीदेखील सुधारते. वॉर्म-अप व्यायामासाठी बागेत 5 मिनिटे जॉगिंग किंवा वेगाने चालणे सर्वाधिक फायदेशीर आहे, जे कोणतीही जिम देऊ शकत नाही. आपल्यापैकी बहुतांश लोकांसाठी बागेतील बाकड्याची उंची स्टेप-अप्स करण्यासाठी अगदी योग्य असते. फक्त एकच विनंती आहे की व्यायाम बूट काढून करा, कारण तुम्ही गेल्यानंतर लोक त्याच बाकड्यावर बसतात. बाकड्यापासून काही फूट मागे उभे राहून आणि हात त्याच्या सर्वात वरच्या पृष्ठभागावर ठेवून तुम्ही पुश-अप्स करू शकता. संतुलन, स्थिरता आणि समन्वय सुधारण्यासाठी सीटेड स्क्वॅट्स करता येतात, ज्यामुळे ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंगला बळकटी मिळते. बाकड्याचे फायदे जाणणारे लोक बेंच साइड प्लँक्सदेखील करतात, ज्यामुळे कंबर आणि ऑब्लिक स्नायूंचा व्यायाम होतो. याशिवाय बाग तुम्हाला असे अनेक फायदे देते, जे जिम देऊ शकत नाही. 1 येथे तुम्ही विविध क्षेत्रांतील वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या आणि ऊर्जा असलेल्या लोकांना भेटू शकता, जे याला सामाजिक आणि जादुईरीत्या प्रेरणादायी बनवते. एकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना कव्हर करण्यासाठी मी पाकिस्तानात गेलो असताना, तिथे मी लाहोरच्या शालिमार गार्डनमध्ये वेगाने चालण्यासाठी गेलो होतो. तेथे माझी भेट अशा एका व्यक्तीशी झाली, जो नुकताच तुरुंगातून सुटला होता आणि आपले आयुष्य रुळावर आणू इच्छित होता. विश्वास ठेवा, जर मी हॉटेलच्या जिममध्ये व्यायाम केला असता तर मला असा अनुभव कधीच मिळाला नसता. तो अनुभव मी विसरू शकत नाही. 2. जर तुम्ही हेडफोनशिवाय व्यायाम किंवा चालण्याचा सराव करत असाल, तर पक्ष्यांचा किलबिलाट आणि पानांची सळसळ तुमचा ताण कमी करेल. 3. आऊटडोअर गार्डनचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुमचे मन तिथे कुणाशीही स्पर्धा करत नाही. तुम्ही रोज त्यांना पाहता त्यामुळे ते तुम्हाला ओळखतात, तरीही त्यांच्याशी कोणतीही वैयक्तिक ओळख नसते. 4. जेव्हा तुम्ही बागेत चालता, धावता किंवा हलका व्यायाम करता तेव्हा हिरवी झाडे आणि निळे आकाश मनावर असे एक अनोखे दृश्य निर्माण करतात, जे जिमचे वातावरण कधीच करू शकत नाही.
फंडा हा आहे की सर्व बागांमधील व्यायामाच्या जागेचे वातावरण सर्वांसाठी समानतेने भरलेले आणि स्वागतार्ह असते. कुणाचे सिक्स पॅक्स जास्त चांगले दिसतात हे सिद्ध न करता, हे नैसर्गिक वातावरण आणि निरोगी राहण्याची मूलभूत इच्छा यांना एकमेकांशी जोडते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



