त्या काळात बजेटच्या चणचणीमुळे माझ्यासारखे आणि इतर अनेक ऑफिसला जाणारे लोक घरून लवकर तयार होणारा लंच डब्यात घेऊन जायचे. त्यात बहुतांश वेळा पराठे, पोळी-भाजी किंवा कर्ड-राइस असायचा. तेव्हा आम्हाला हे माहीत नव्हते की, यामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त आणि पोषणतत्त्वे कमी असतात. आम्हाला हेही माहीत नव्हते की, फर्मेंटेड फूड असल्यामुळे कर्ड-राइस चांगला असतो. प्रत्येक भाजीचा एकच जोडीदार असायचा - बटाटा, फक्त त्या भाज्या वगळून ज्या भेंडी, गवार आणि बीन्स फॅमिलीसारख्या पातळ आणि सुंदर दिसायच्या. तेव्हा आमच्यासारख्या ऑफिसला जाणाऱ्यांमध्ये असा विनोद चालायचा की, बटाट्याला या पातळ, हिरव्या रंगाच्या सुंदर मुलींशी प्रेम झाले होते आणि त्या सर्वांनी त्याच्या विचित्र आकारामुळे हे सांगत लग्नास नकार दिला की, ‘तुझ्यासारख्या कुरूप मुलाशी कोण लग्न करेल?’ लज्जित आणि निराश झालेल्या आमच्या ऑल-टाइम फेव्हरेट बटाट्याने त्यांना शाप दिला की, त्या आयुष्यभर कुमारिका राहतील. म्हणूनच आजही त्यांना वेगळे शिजवले जाते, तर बटाटा मात्र इतर प्रत्येक भाजीचा जोडीदार बनतो. असो, विनोद बाजूला ठेवूया. आज आपल्यापैकी बहुतांश जण घरचे बनवलेले जेवण ऑफिसला घेऊन जातात. याचे कारण फक्त बजेटची चणचण नाही, तर हेल्दी फूड खाण्याची इच्छा हेदेखील आहे, कारण मार्केटमध्ये अनहेल्दी फूडचा सुळसुळाट झाला आहे. यूकेमधील ओकाडोच्या एका संशोधनानुसार, याचे एक कारण हेदेखील आहे की, ऑफिसजवळ लंच खरेदी करणे किंवा फूड डिलिव्हरी ॲपवरून मागवणे खूप महाग झाले आहे. याच वर्षी ऑगस्टमध्ये यूकेच्या 2126 ऑफिसला जाणाऱ्यांवर एक सर्वेक्षण झाले, ज्याचे निष्कर्ष 14 सप्टेंबरला प्रसिद्ध झाले. यातून असे दिसून आले की, हे प्रौढ लोक पैसे वाचवण्याचे स्मार्ट आणि व्यावहारिक मार्ग शोधत आहेत. त्यामुळे बाहेर खाण्यापिण्याचा खर्च कमी करण्यासाठी ते पॅक्ड लंचचा पर्याय स्वीकारत आहेत. जगभरात ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी वेगाने पॅक्ड लंचकडे वळत आहेत. असे केवळ यासाठी होत नाहीये की त्यांना वाढत्या महागाईतून आपले बजेट वाचवायचे आहे, तर त्यांना जेवणातील पोषणतत्त्वेदेखील वाढवायचे आहेत आणि त्यांना ‘हिडन हंगर’चा सामना करायचा नाहीये. हा कुपोषणाचा असा एक प्रकार आहे, ज्यामध्ये व्यक्ती पोट भरण्यासाठी पुरेशा कॅलरीज तर घेते, पण त्याच्या आहारात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असते. दिसणाऱ्या भुकेच्या किंवा गंभीर कॅलरी-डेफिशियन्सीच्या तुलनेत ही स्थिती ‘छुपी’ असते, कारण यात अंडरफेड असण्याची शारीरिक लक्षणे लगेच दिसत नाहीत. पण काळासोबत ती आरोग्याला आणि विकासाला हानी पोहोचवते. पॅक्ड लंच लोकप्रिय होत आहे. सर्वेक्षणानुसार, 64% तरुण कर्मचाऱ्यांनी याचा अवलंब केला आहे. हे तरुण एआयच्या मदतीने हे सुनिश्चित करतात की त्यांच्या लंचमध्ये व्हरायटी राहील, जेणेकरून जेवताना कंटाळा येणार नाही आणि त्यात प्रोटीन, फायबर, फॅट आणि दह्यासारख्या आवश्यक गोष्टीही असतील. जर तुम्ही या तरुण कर्मचाऱ्यांना पाहिले, तर ते नेहमी नट्स आणि सीड्सचा एक बॉक्स स्वतःसोबत किंवा ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये ठेवतात. मला आश्चर्य वाटते की ते किती प्लॅन्ड असतात. मला सांगण्यात आले की, मूठभर मिक्स्ड नट्स आणि सीड्समध्ये 200 कॅलरीजपेक्षा थोडेच कमी प्रमाण असते. यात 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन, 2 ते 5 ग्रॅम फायबर असते आणि हे सर्व अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. अनेक रिसर्च सांगतात की, दररोज नट्स खाल्ल्याने कार्डियोव्हॅस्कुलर आजारांचा धोका 20% पर्यंत कमी होतो. प्रोटीनमुळे पोट भरलेले राहते. 25-30 ग्रॅम फायबर हृदयविकार आणि टाइप-2 डायबिटीसचा धोका कमी करते. चांगले तेल, सीड्स, फ्रुट्स आणि नट्स गंभीर कार्डियोव्हॅस्कुलर आजार कमी करण्यास मदत करतात. आपल्या पूर्वजांनी सणांसाठी जेवणाची जितकी व्हरायटी तयार केली होती, त्यापैकी बहुतांश पदार्थ मॉडर्न फूड लेबल्सशी मिळुतेजुळते आहेत. फंडा हा आहे की, आपला ऑफिस लंच केवळ पैसे वाचवण्यासाठी पॅक करू नका, तर तो तुम्हाला या ‘हंगर’ आणि ‘हिडन हंगर’पासूनही वाचवेल, याची खात्री करा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: मी मनोज जरांगेंवर बोलणे का टाळतोय? छगन भुजबळांनी स्वतःच सांगितलं कारण, सरकारलाही खडा सवाल
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान




























Subscribe to my channel




