“मे आय कम इन?’ हा आवाज ऐकताच एचआर मॅनेजरने टेबलवरून मान वर केली आणि संमती दर्शवली. उमेदवार आत आला. तो खुर्चीवर रेलून बसला आणि नीट बसण्याचा त्याने प्रयत्नही केला नाही. एचआर मॅनेजर काही सेकंद तो कानातील एअरपॉड्स काढेल याची वाट पाहत होत्या. त्याने ते न काढल्यामुळे त्यांनी त्याला एअरपॉड्स काढायला सांगितले. नंतर त्याला कॅशियरच्या नोकरीत का रस आहे, असा प्रश्न विचारला. तो म्हणाला, “ही अर्धवेळ नोकरी आहे. मला माझ्या मोकळ्या वेळेत करायचे आहे त्यासाठी ही सोयीची आहे. मी मित्रांसोबत फिरू शकतो, सुट्ट्यांवर जाऊ शकतो आणि इतर गोष्टीही करू शकतो.’ त्याचा प्रतिसाद आणि देहबोलीने निवड समितीला स्पष्ट संदेश मिळाला. हा तरुण शुक्रवारी रात्री पार्टी करून शनिवारी सकाळी उत्साहाने कामावर येणारा नव्हता. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अडथळा आला तर तो सर्वात आधी कामाचाच त्याग करेल हे स्पष्ट होते. दुसरा उमेदवार वेगळा होता. त्याचे दिसणे, गांभीर्य व संयम यामुळे समिती प्रभावित झाली. बोलावल्याशिवाय तो बसला नाही. बसल्यावरही तो सरळ बसून ऐकण्यासाठी तयार होता. त्याला निवडले गेले आणि पॉइंट ऑफ सेल काउंटरवरील (पीआेएस) तरुण कॅशियरचे काम दोन तास पाहण्यास सांगितले. त्याची परीक्षा एका रिकाम्या काउंटरवर सुरू झाली. बिल 1272 रुपयांचे होते. ग्राहक बनलेल्या एचआर मॅनेजरने त्याला 500 रुपयांच्या तीन नोटा दिल्या. गल्ल्यात 10 रुपयांपर्यंतच्याच नोटा व 1 रुपयाची दोन नाणी होती. यंत्राने 228 रुपये परत दाखवले. तो अडखळला. आधी तो म्हणाला की, त्याच्याकडे सुट्टे पैसे नाहीत. ग्राहकाने त्याला 1 रुपयाची दोन नाणी देऊन 230 रुपये परत देण्याचा सल्ला दिला. पण उमेदवार संकोचला आणि मशीन स्पष्टपणे 228 रुपये दाखवत असल्याचे सांगितले. तो आपले काउंटर बंद करून दुसऱ्या काउंटरवर गेला, सुट्टे पैसे आणले आणि अगदी अचूक रक्कम परत केली. या सर्व प्रक्रियेत चार मिनिटे गेली आणि रांगेत आणखी पाच ग्राहक वाढले. एचआर टीमने त्याला एक आठवड्याच्या प्रशिक्षणावर पाठवण्याचा निर्णय घेतला. हे प्रशिक्षण रोख रक्कम हाताळण्याचे नसून गर्दी व्यवस्थापनाचे होते. दोन्ही उमेदवार तांत्रिकदृष्ट्या सक्षम होते. पण दोघांना वेगळे करणारी गोष्ट म्हणजे दोघांचा कामाबद्दलचा दृष्टिकोन होय.
रविवारच्या दुपारी जळगाव येथे ‘जैन इरिगेशन’च्या कार्यालयात माझी भेट कंपनीचे अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन आणि अतुल जैन या चारही संचालक भावांशी झाली. मी त्यांना ही उदाहरणे सांगितली. समाज जेन-झीकडे (Gen-Z) नकारात्मकतेने पाहतो. ते खरोखर तितके वाईट नाहीत, यावर त्यांचेही एकमत झाले. जेन-झीचे तरुण वेगळा विचार करतात. विशिष्ट मूल्यांना महत्त्व देतात आणि आपले मत उघडपणे मांडतात, असे त्यांचे म्हणणे होते. कदाचित म्हणूनच समाज त्यांच्याबद्दल अनेक पूर्वग्रह बाळगतो. अनिल जैन म्हणाले, “जेन-झीला हाताळण्यासाठी आधी आपल्याला स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करावे लागतील.’ मागील आठवड्यात बिल गेट्स यांनी भविष्यातील तंत्रज्ञानाविषयी सांगितलेल्या गोष्टी नक्कीच ऐकल्या असतील. तंत्रज्ञानाचा अंदाज बांधण्यात त्यांचा अनुभव उत्तम राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या सांगण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी भविष्यवाणी केली की, येत्या काही वर्षांत केवळ काही जाती किंवा दिव्यांगांनाच नोकरीत आरक्षण मिळणार नाही, तर संपूर्ण मानवी प्रजातीलाच आरक्षणाची गरज भासू शकते. कारण रोबोट्स आणि एआय आपल्या नोकऱ्या हिरावून घेऊ शकतात. हे कदाचित पहिल्या उमेदवाराच्या निष्काळजीपणामुळे किंवा दुसऱ्याच्या गणितीय आकलनाच्या अभावामुळे घडू शकते. पण मध्य प्रदेशातील ब्यावरा येथील 21 वर्षांचा बीएस्सीचा विद्यार्थी सुरेंद्रसिंह चौधरी याच्यासारखे तरुणही आहेत. त्यांना थेट घरी नोकरीच्या ऑफर्स येतात. सात महिने त्याने एकट्यानेच प्रदूषित अजनार नदीची स्वच्छता केली. बहुधा म्हणूनच त्याला नेदरलँड्समधून नोकरीची ऑफर आल्याच्या बातम्या येत आहेत. सुरेंद्रसारखे समर्पित कर्मचारी आपल्याला का मिळत नाहीत, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? मी नेहमी नाकारलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतो, जेणेकरून त्यांचे वर्तन समजून घेता येईल. स्वतःचे घर खरेदी करावे इतका पगार त्यांना मिळत नाही. आर्थिक अस्थिरता, वाढता खर्च आणि सोशल मीडियावर होणारी सततची तुलना यामुळे ते पालकांसारखे कामासाठी पूर्ण समर्पित होण्यापासून मागे हटतात. फंडा असा आहे की, तुम्ही जेन-झीची वागण्याची पद्धत समजून घेतली तर त्यांच्या वर्तनामुळे तुम्ही त्यांना नाकारणार नाही. मी पहिल्या उमेदवाराला नोकरी दिली होती हे अगदी तसेच आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




