युथ काँग्रेसचा गोंधळImage Credit source: गुगल
India AI Impact Summit 2026: राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये सध्या एआयचा जागर सुरू आहे. हाय प्रोफाईल एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान आज मोठा गोंधळ उडाला. युथ काँग्रेसचे कार्यकर्ते सुरक्षा रक्षकांना चकमा देत आत शिरले आणि त्यांनी गोंधळ घातला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा बाजी केली. PM is Compromised असे नारे त्यांनी दिले. त्यांनी टी शर्ट काढले आणि घोषणाबाजी केली. हे आंदोलन सुरू असताना या समिटमध्ये देश-परदेशातील अनेक प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. युथ काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक बॅनर आणि पोस्टर घेऊन मुख्य हॉलजवळ धडकले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा हालली. त्यांनी आंदोलनकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतले. त्यांना समिटच्या बाहेर काढण्यात आले. याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
एआय समिट म्हणजे पीआर तमाशा
युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप लावला आहे की, भारत सरकार इंडो-युएस ट्रेड डीलप्रकरणात अमेरिका आणि उद्योजकांच्या दबावापुढे झुकले आहे. आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांना कॉम्प्रोमाईज पीएम असल्याचा आरोप केला आहे. पण काँग्रेस देशाच्या हिताला बाधा येऊ देणार नाही असा दावा त्यांनी केला. या आंदोलनापूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी एआय समिटवर नाराजी व्यक्त केली होती. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना हा पीआर तमाशा असल्याचा आरोप केला होता. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी समिटच्या व्यवस्थापनावर आणि असुविधांवर नाराजी व्यक्त केली. युथ काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना टिळक मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. तर काही जणांना समिटच्या बाहेर काढले आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
भारत मंडपमध्ये देशातील सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. बायोमॅट्रिक्स आणि QR कोड आधारित पास व्यवस्था आहे. त्याशिवाय या ठिकाणी प्रवेश करता येत नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी कुणाच्या पासचा वापर केला. त्यांनी पास कुठून मिळवले याविषयीचा तपास पोलीस करत आहेत. त्याआधारे सुरक्षा व्यवस्थेत कुठे चूक झाली आणि आंदोलनकर्ते थेट मुख्य मंचापर्यत दाखल झाले कसे याचा शोध घेण्यात येत आहे.
#WATCH | Delhi: Indian Youth Congress workers staged a topless protest and chanted anti-Modi slogans at Bharat Mandapam
(Source: Indian Youth Congress) pic.twitter.com/WCZgCMwkFZ
— ANI (@ANI) February 20, 2026
भाजपचा हल्लाबोल
या आंदोलनाविरोधात भाजपने संताप व्यक्त केला. भाजपने या आंदोलनावर तिखट हल्लाबोल केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आता काँग्रेसची कीव येत आहे. राहुल गांधी यांच्या निर्देशानंतर आंदोलनकर्ते या आंतरराष्ट्रीय एआय शिखर संमेलनात घुसले आणि त्यांनी गोंधळ घातला. काँग्रेस शहरी नक्षलींप्रमाणे वागत असल्याचा आरोप भंडारी यांनी केला. काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


