महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या रमाबाई रणवीर यांची गोष्ट फक्त त्यागाची नाही. 5 हजार रुपयांसारखी छोटी रक्कम वेगवेगळ्या हातांत गेल्यावर तिची किंमत कशी बदलते, हे ती सांगते. 47 वर्षांच्या रमाबाई बीडच्या ध्यानदीप अकादमीच्या स्वयंपाकघरात काम करतात. 9 हजार रुपये महिन्याच्या पगारावर त्या रोज 200 पेक्षा जास्त चपात्या बनवतात. 2012 मध्ये पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी हे काम सुरू केले. त्यांची लहान मुलगी आरती (20) ही बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी आहे. ती नांदेडमध्ये एकटी राहते. 28 ऑगस्टला तिने फोन करून जेवणासाठी आणि खोलीच्या भाड्यासाठी पैसे मागितले. रमाबाईंकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्या रात्रभर झोपू शकल्या नाहीत. त्याच संध्याकाळी रमाबाईंनी एक गोष्ट ऐकली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेत त्या पहिल्या आल्या, तर त्यांना 3 हजार रुपये बक्षीस मिळू शकतात. धावण्याची शर्यत म्हणजे काय, हेसुद्धा त्यांना ठाऊक नव्हते. या लांब आणि कठीण शर्यतीसाठी आपले कोणतेही प्रशिक्षण झालेले नाही, याची त्यांनी पर्वा केली नाही. तिथे बिनाबुटांची धावणारी त्या एकमेव स्पर्धक होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी विधवा रामाबाई पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसोबत पिकअप गाडीत बसून निघाल्या. त्या ज्या अकादमीत काम करायच्या, तिथूनच त्या निघाल्या होत्या. त्या आपल्या आयुष्यातील पहिल्या शर्यतीत भाग घेणार होत्या. त्या साडी घालूनच धावल्या. धावताना त्यांची चप्पलही तुटली. पण 3 किलोमीटरची शर्यत पूर्ण होईपर्यंत त्या धावतच राहिल्या. आपण जिंकलो तर मुलीच्या शिक्षणाच्या खर्चाची अडचण थोडी कमी होईल, एवढाच विचार त्यांच्या मनात होता. शेवटी एका आईच्या या ठाम जिद्दीचा विजय झाला. शर्यत जिंकल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, ‘माझे आयुष्य याच शर्यतीवर अवलंबून आहे, असा विचार करून मी धावले. हे अंतर पार करायला मला किती वेळ लागेल, हे मला माहीत नव्हते. अंतिम रेषा पार केल्यानंतरच मी थांबले.’ त्यांना 3 हजार रुपयांऐवजी 5 हजार रुपये देण्यात आले. त्यांनी लगेच आपल्या दुसऱ्या मुलीसाठी, पूजासाठी वह्या आणि पेन खरेदी केले. उरलेले पैसे त्यांनी आरतीसाठी बाजूला ठेवून दिले. रमाबाईंसारखे अनेक आई-वडील संपूर्ण भारतात आहेत. हे पालक रोज आपल्या परीने अशक्य वाटणारे गणिताचे हिशोब जुळवत असतात. ‘मी आज कोणता खर्च टाळावा जेणेकरून माझ्या मुलाला त्याचे स्वप्न बाजूला ठेवावे लागणार नाही?’ असा विचार ते करतात. अनेक वर्षांपूर्वी नागपूरच्या सौनित्रा इंगळे या ऑटोरिक्षाचालकाची अशीच एक गोष्ट होती. ते महिन्याला अवघे 2500 रुपये कमवायचे. पण मुलीच्या शिक्षणासाठी ते रोज 20 रुपये बाजूला ठेवायचे. ते स्वतः अत्यंत कठीण परिस्थितीत वाढले होते. त्यामुळे आपल्याला संधी मिळाल्या नाहीत. त्या मुलीला मिळाव्यात अशी त्यांची इच्छा होती. ही रक्कम ऐकायला खूप छोटी वाटते. पण एवढे कमी कमावणारा माणूस रोज 20 रुपये वाचवत असेल, तर याचा अर्थ तो स्वतःच्या तात्कालिक गरजांपेक्षा मुलीच्या भविष्याला जास्त महत्त्व देत होता. याच वर्षी मार्च महिन्यात यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2025-2026 मध्ये पहिल्याच प्रयत्नात देशभरात 57 वी रँक मिळवणाऱ्या केरळातील तिरुवनंतपुरमच्या जे. एस. श्रीजा हिने आपल्या पालकांच्या त्यागाबद्दल सांगितले. तिचे वडील जयकुमार हे गवंडीकामात मदत करणारे रोजंदारी मजूर आहेत. ते कामावर जाण्या-येण्यासाठी रोज 40 किलोमीटर सायकल चालवायचे. श्रीजाच्या शिक्षणासाठी त्यांनी पत्नीचे मंगळसूत्र आणि घरातील सोने गहाण ठेवून 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. श्रीजाचे पूर्ण लक्ष अभ्यासावर राहावे म्हणून ते रात्री स्वयंपाकघरातही मदत करायचे. छत्तीसगडमध्ये ज्योती पाटील यांनी पतीच्या निधनानंतर कुटुंब चालवण्यासाठी आणि मुलीचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ऑटोरिक्षा चालवायला सुरुवात केली. नंतर त्यांची मुलगी वर्तिका ही रायपूरच्या सरकारी शाळेतील अशा दोन विद्यार्थ्यांपैकी एक ठरली, जिच्या जलसंरक्षण प्रकल्पाचे आयआयटी तिरुपतीमधील एका स्पर्धेत आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी कौतुक केले. फंडा असा आहे की, आज मी काय त्याग करू शकतो, जेणेकरून माझ्या मुलाला उद्या कोणताही त्याग करावा लागणार नाही? असा विचार आई-वडील करतात. तेव्हा छोटी रक्कमसुद्धा छोटी राहत नाही. कारण तीच छोटी रक्कम उद्या आशा, सन्मान व कधी-कधी मुलाच्या भविष्याचे मूल्य ठरू शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




