फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; शेतकर्यांच्या मोटारी व विद्युत साहित्य चोरीचे ८ गुन्हे उघड, ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.

सातारा जिल्ह्यातील फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कसून तपासादरम्यान एक मोठी कारवाई समोर आली आहे. विडणी आणि परिसरातील शेतकर्यांच्या शेतातील मोटारी, पम्प्स आणि विविध विद्युत साहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका महिलेचे मंगळसूत्र लुटण्याच्या गुन्ह्याच्या तांत्रिक तपासातून झाली, ज्यातून पोलीस थेट शेतकरी व कृषी साहित्याची चोरी करणाऱ्या मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचले.

तपासाची दिशा आणि उघड झालेले गुन्हे: फलटण ग्रामीण पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांना काही संशयितांची माहिती मिळाली. पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी विडणी व आसपासच्या परिसरातील शेतकर्यांच्या शेतातील पाण्याचे पंप, इलेक्ट्रिक मोटारी आणि इतर बहुमूल्य विद्युत साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली. या एकाच कारवाईमुळे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत प्रलंबित असलेले तब्बल आठ गुन्हे एकाच वेळी उघडकीस आले आहेत.

४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त: पोलिसांनी या कारवाईदरम्यान आरोपींकडून चोरीला गेलेला ऐवज जप्त केला असून, एकूण ४ लाख ८० हजार रुपयांच्या मुददेमालाची वसुली करण्यात आली आहे. दिवसेंदिवस शेती क्षेत्रातील साहित्याची होणारी चोरी आणि त्यामुळे शेतकर्यांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान या पार्श्वभूमीवर फलटण पोलिसांच्या या कामगिरीमुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागातील अशा प्रकारच्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *