छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरातून नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी थेट खेळ करणारा एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. फुलंब्री शहरातील दाट लोकवस्तीच्या आणि वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या शिवमनगरी परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर बायोमेडिकल वेस्ट (Biomedical Waste) म्हणजेच घातक वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलेल्या सिरिंज (Syringes), इंजेक्शनच्या खाली आणि भरलेल्या काचेच्या बाटल्या (Vials), औषधांचे बॉक्स तसेच इतर वैद्यकीय साहित्य थेट उघड्यावर फेकून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, काही वैद्यकीय कचऱ्याचे बॉक्स उलटल्यामुळे हा संपूर्ण कचरा थेट रस्त्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात विखुरल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रुग्णालये, क्लिनिक्स, किंवा वैद्यकीय लॅबमधून निघणारा हा बायोमेडिकल कचरा नष्ट करण्यासाठी शासनाचे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अत्यंत कडक नियम व मार्गदर्शक सूचना आहेत. हा कचरा मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक मानला जातो. परंतु, नियमांना आणि कायदेकानूंना न जुमानता कोणत्यातरी बेजबाबदार रुग्णालयाने किंवा वैद्यकीय व्यावसायिकाने आपले क्लिनिक क्लिनिंग करताना किंवा कचरा विल्हेवाट लावण्यासाठीची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता हा कचरा थेट रात्रीच्या सुमारास किंवा एकांतात शिवमनगरी परिसरातील रस्त्यालगत फेकून दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या परिसरामध्ये लहान मुले खेळण्यासाठी बाहेर येतात, तसेच शाळकरी मुलांची व नागरिकांची दिवसभर सतत ये-जा असते. अशा वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी वापरलेल्या सिरिंज आणि सुया उघड्यावर पडल्यामुळे एचआयव्ही (HIV), हिपॅटायटीस यांसारख्या गंभीर संसर्गजन्य आजार पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एखादा खेळणारा बालक या सुयांच्या संपर्कात आल्यास अनर्थ ओढवू शकतो, या भीतीने पालकांच्या पाяखालची जमीन सरकली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, असा कचरा टाकणाऱ्या संबंधित डॉक्टर किंवा लॅब चालकाचा शोध घेऊन त्यांच्यावर सदोष वधाचा किंवा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहर
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- मुंबई: घाटकोपर स्थानकावर थरार; लोकलच्या छतावर चढलेल्या ३० वर्षीय तरुणाने ओव्हरहेड वायरला केला स्पर्श; विजेच्या तीव्र धक्क्याने तरुण गंभीर जखमी
- पुणे: "आमच्या लेकीला न्याय द्या!" पिंपळवंडीतील घटनेमुळे संतप्त नागरिकांचा पुणे-नाशिक महामार्गावर तब्बल २ तास रास्ता रोको
- पुणे: पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र संपन्न; विद्यार्थ्यांनी घेतले डिजिटल सुरक्षेचे धडे!
महाराष्ट्र
- बारामती: "दादांची भीती राहिलेली नाही" युगेंद्र पवारांची सुनेत्रा पवारांवर टीका, सोबतच पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- मुंबई: घाटकोपर स्थानकावर थरार; लोकलच्या छतावर चढलेल्या ३० वर्षीय तरुणाने ओव्हरहेड वायरला केला स्पर्श; विजेच्या तीव्र धक्क्याने तरुण गंभीर जखमी
- कोल्हापूर: धावत्या ई-बाईकचा थरार! अवघ्या तीन महिन्यांपूर्वी घेतलेली इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यातच जळून खाक; महिलेचा टळला अनर्थ
गुन्हा
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट


























Subscribe to my channel




