बीड: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावण सोमवारी आणि नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर राज्यभरातून व परराज्यातूनही हजारो भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. या पवित्र दिवशी भाविकांनी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन चांगल्या पावसामुळे शेती व सुबत्ता लाभावी यासाठी साकडे घातले आहे.
यंदाच्या श्रावण महिन्यात पहिल्याच सोमवारी नागपंचमी आल्यामुळे परळीच्या वैद्यनाथ मंदिरात विशेष धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला असून, वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये तब्बल ३ हजार किलो फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. या दुर्मिळ योगामुळे गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, नवी दिल्ली यांसारख्या विविध राज्यांमधून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक परळीत दाखल झाले आहेत.
भाविकांना सुरळीत, सुलभ व सुरक्षित दर्शन घेता यावे यासाठी प्रभू वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली असून, पासधारकांसाठीही स्वतंत्र रांग ठेवण्यात आली आहे. तसेच पावसापासून व उन्हापासून भाविकांचे संरक्षण व्हावे म्हणून संपूर्ण दर्शनरांगेवर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण मंदिर परिसरात १२० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि चोख बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासनाचे पथकही तैनात करण्यात आले आहे. श्रावणातील पहिल्या सोमवारी आलेल्या या पवित्र सणामुळे परळी नगरीत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
शहर
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
महाराष्ट्र
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




