पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महापालिकेत शुक्रवारी (दि. १४) बैठक घेतली. अँटनी कंपनीला पाठीशी घातले जात आहे, अशी टीका सत्ताधारी आणि प्रशासनावर पवार यांनी केली. मागील वेळी पवार यांनी आमदार महेश लांडगे यांचे ठेकेदारांना पाठबळ असल्याची टीका केली होती. 'महापालिकेत शून्य असलेल्या पक्षाने टीका करणे योग्य नाही. नगरकडे लक्ष द्यावे, येथे लुडबूड करू नये,' असे पवार यांच्या टीकेस भाजपचे पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी उत्तर दिले आहे.
मोशी दुर्घटनेवरून मागील आठवड्यात आमदार रोहित पवार यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला होता. भोसरीतील कचरा ठेकेदार आणि कंपनीला आमदार लांडगे यांचे पाठबळ आहे, अशी थेट टीका केली होती. त्यानंतर आज महापालिकेस भेट दिली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून माहिती घेतली.
आमदार रोहित पवार म्हणाले, पीडित कुटुंबीयांना एक कोटी रुपये मदत मिळावी, अशी आमची मागणी होती. त्यामुळे २५ लाखांवरून चाळीस लाखांवर कंपनी गेली. त्या कुटुंबीयांना हक्काचे घर मिळावे. आता पीडित कुटुंबीयांना धमकावून ४० लाख घेण्याबाबत सांगण्यात येत आहे, याबाबत शहानिशा करणार आहे. दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना केवळ निलंबित करून चालणार नाही, तर नोकरीतून बडतर्फ करावे. अँटोनी कंपनीच्या मालकावर देखील गुन्हा दाखल करावा. कंपनीतील आल्हाट नावाचे अधिकारी देखील जबाबदार आहेत. मोशी डेपोत घरगुती ओल्या कचऱ्यापासून सीएनजी निर्मितीचा नवीन प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. अहवाल अद्याप आलेला नाही, त्याची आम्हीही वाट पाहत आहोत.
महापालिका पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कंपनीवर प्रशासनाने कारवाई केली आहे. समितीकडून चौकशी सुरू आहे. आरोप करणारे महिन्यानंतर आले आणि राजकीय आरोप करीत आहेत. अपघाताला भाजप आणि आमदार जबाबदार आहेत. आमदार महेश लांडगे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. मोशीतील कचरा काय आमदार लांडगे यांनी निर्माण केला आहे का? यापूर्वी राष्ट्रवादी सत्तेत होती. मग काय मोशीच्या घटनेस राष्ट्रवादी जबाबदार आहे का? किमान आम्ही प्रक्रिया प्रकल्प सुरू केले; मात्र तुम्ही काय केले, असा प्रश्न आहे. आम्हीही राष्ट्रवादीत काम केले, मात्र कोणाच्या तरी सांगण्यावरून टीका आणि लुडबूड करणे रोहित पवार यांना शोभत नाही.
शहर
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
महाराष्ट्र
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- रत्नागिरी: कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर राहिला बिबट्या; सर्व कोंबड्या फस्त करत दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर केला हल्ला!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




