सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर

सांगली: महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि आपल्या वेगळ्या परंपरेसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील नागपंचमी उत्सवाबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा येथील ग्रामस्थांना केंद्रीय पर्यावरण, हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासा मिळाला असून, शर्ती व अटींच्या अधीन राहून यंदा तब्बल ४१ ग्रामस्थांना शैक्षणिक व सर्प संरक्षण जनजागरणासाठी नाग पकडण्याची व प्रदर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. गतवर्षी ही परवानगी २१ जणांना देण्यात आली होती, ज्यामध्ये यावर्षी वाढ करण्यात आली आहे.

शैक्षणिक उद्देश आणि पारंपरिक ज्ञानाचा प्रसार: वन्यजीव विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ही परवानगी केवळ आणि केवल शैक्षणिक उद्देशासाठी, सर्प संरक्षणाबद्दलचे पारंपरिक ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर पारंपरिक उत्सव साजरा व्हावा आणि वन्यजीवांचे संवर्धन व्हावे, यासाठी कायदेशीर मार्qांचा अवलंब करून हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपंचमीच्या सणानिमित्त शिराळा नगरीत या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आणि सर्पमित्र वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

न्यायालयाचे आदेश व प्रशासनाची कठोर भूमिका: मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे सर्व ग्रामस्थांसाठी बंधनकारक असणार आहे. नाग हा वन्यप्राणी असून त्यास विनाकारण पकडणे, त्याची पूजा करणे, त्यास कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणे किंवा कायद्याचे उल्लंघन होईल अशा स्वरूपाचे फोटो अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे.

या नियमांचे किंवा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर वन विभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असून, यामध्ये दंडासह कारावास होण्याचीही तरतूद आहे. नागपंचमीचा हा सण पूर्णपणे कायदेशीर, सुरक्षित आणि वन्यजीवांच्या संरक्षणास पूरक अशा पद्धतीने पार पाडावा, यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *