पुणे: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' ही विशेष मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आस्थापना आणि डेअरींवर धडक तपासणी मोहीम राबवली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आणि मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळल्याने तब्बल १६ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
कोणत्या प्रमुख आस्थापनांवर झाली कारवाई? अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईत अनेक नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि फूड चेनचा समावेश आहे. तपासणीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यामुळे खालील आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे:
-
फॉर्च्यून एंटरप्रायझेस (हॉटेल सयाजी), लोणावळा
-
हॉटेल चूल मटण, लोहेगाव
-
सिम्पली साऊथ, भोसरी
-
हॉटेल पवन, कोल्हापूर
-
राजेश चायनीज, सांगली
-
बर्गर किंग, कॅम्प, पुणे
-
डोमिनोज पिझ्झा आणि पिझ्झा हट (मलकापूर व कराड परिसर)
-
जेबीएम हॉस्पिटॅलिटी (वानवडी येथील एचडीएफसी बँकेची कॅन्टीन) - ही कॅन्टीन कोणत्याही वैध परवान्याशिवाय विनापरवाना सुरू असल्यामुळे ती तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
अस्वच्छता आणि अन्न हाताळणीतील गंभीर त्रुटी: तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अन्न तयार करण्याच्या आणि साठवण्याच्या जागेवर अत्यंत अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. अन्न हाताळणीमधील त्रुटी, निकृष्ट दर्जाचे घटक, तसेच अन्न सुरक्षा आणि मानके (Food Safety Standards) नियमांचे योग्य पालन होत नसल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही आस्थापनांना अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे. या कठोर कारवाईमुळे राज्यातील अन्न व उपाहारगृह व्यवसायात मोठी खळबळ उडाली असून हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच 'फाफरा' उडाला आहे.
शहर
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
- राजगड: गोळीबाराने खळबळ! ४७ वर्षीय व्यक्तीवर झाडली गोळी; आरोपीला पोलिसांकडून अवघ्या ८ तासांत अटक!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर





























Subscribe to my channel




