नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा

नाशिक: एका अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गुन्हेगारी प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर तळेगाव शिवारातील एका खासगी बंगल्यात केमिकलचा वापर करून ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचे समोर आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई करत एका आंतरराज्य टोळीला रंगेहात पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बुधवारी सायंकाळी तळेगाव येथील बंगल्यावर छापा टाकला. यावेळी आरोपी केमिकलच्या मदतीने बनावट नोटांची छपाई करत असताना पोलिसांच्या तावडीत सापडले. या छाप्यात पोलिसांनी तब्बल १२ लाख १९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ५ जणांना अटक केली असून, त्यामध्ये तेलंगणातील अमरेश्वर सुधाकर आईथा आणि दासरी प्रसाद सत्यई, तर नाशिकमधील गोकुळ आनंदराव दाते, हिरामण पुंजा दाते आणि मच्छिंद्र भगवान घनदाट यांचा समावेश आहे.

 

 

या टोळीची कार्यपद्धती अत्यंत नियोजित होती. हे आरोपी लोकांना १० लाख रुपयांच्या अस्सल नोटांच्या बदल्यात तब्बल ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत असत. या प्रलोभनाला बळी पडून अनेक लोक त्यांच्या जाळ्यात अडकत होते. अशाच एका व्यवहाराची तयारी सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून या टोळीला जेरबंद केले.

या टोळीतील काही सदस्य तेलंगणातील असल्याने हे प्रकरण आंतरराज्यीय स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट होत आहे. बनावट नोटांचे हे जाळे नेमके किती मोठे आहे, हे नोटा इतर जिल्ह्यांत किंवा राज्यांत पोहोचवल्या गेल्या होत्या का, तसेच यामागे आणखी काही बड्या व्यक्तींचा हात आहे का, याचा सखोल तपास आता त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत. नाशिकसारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक शहरात अशा प्रकारच्या गुन्हेगारी टोळीचा उगम होणे ही चिंतेची बाब असून, या कारवाईमुळे नाशिकच्या गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *