कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालयांमधील रुग्णांसाठी वापरण्यात आलेले बेडशीट, गाद्यांचे कव्हर व इतर कापड धुण्यासाठी तब्बल ६०० किलोमीटरचा अवाढव्य प्रवास घडवून आणला जात असल्याचा एक अत्यंत संतापजनक व थक्क करणारा प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील, विशेषतः डोंगरी व दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालयांमधील वापरलेले कपडे थेट पुण्यातील आणि तळेगाव येथील लॉन्ड्रीकडे धुलाईसाठी नियमितपणे पाठविले जात आहेत. स्थानिक पातळीवर किंवा जिल्ह्यातच कपडे धुण्याची सोय उपलब्ध असताना, केवळ प्रशासकीय व कंत्राटदाराच्या धोरणामुळे कपड्यांच्या वाहतुकीसह धुलाईवर वर्षाकाठी लाखो रुपयांची उधळपट्टी होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कशी चालते ही ६०० किलोमीटरची यंत्रणा?
-
कपडे गोळा करण्याचा प्रवास: मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसीमधून एक वाहन दोन कर्मचाऱ्यांसह ग्रामीण रुग्णालयांकडे रवाना होते. हे वाहन विविध तालुक्यांमधील रुग्णालयांतून कपड्यांच्या पिशव्या गोळा करते. एका दिवसात जवळपास ७ ते १० रुग्णालयांमधून कपडे गोळा केल्यानंतर हे वाहन पुन्हा शिरोली एमआयडीसीत येते.
-
पुण्याकडे रवानगी: शिरोलीत जमा केलेले हे कपडे नंतर दुसऱ्या मोठ्या वाहनात भरले जातात आणि हे वाहन पुणे-तळेगावच्या दिशेने रवाना होते. तळेगाव किंवा पुणे येथील आधुनिक लॉन्ड्री युनिटमध्ये हे कपडे धुतले जातात आणि त्यानंतर पुन्हा ते रुग्णालयांमध्ये पोहोचवले जातात. या संपूर्ण प्रक्रियेत येण्या-जाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा फेरा पडतो.
-
मोजक्या कपड्यांसाठीही फेऱ्या: अनेकदा डोंगरी व दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने धुलाईसाठी अवघे चार-पाच कपडे जमा होतात. अशा अत्यंत मोजक्या कपड्यांसाठीही वाहन संबंधित रुग्णालयापर्यंत जाते, कोल्हापूरला येते आणि पुन्हा पुण्याला पाठवले जाते.
कंत्राटदाराचा कारभार आणि स्थानिक दुर्लक्ष:
-
सूत्रांच्या माहितीनुसार, 'आनंद' नावाच्या खासगी कंपनीकडे हे कपडे धुण्याचे कंत्राट असून 'सिंम्प्ली' नावाच्या कंपनीकडून या कपड्यांची वाहतूक केली जाते.
-
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरात व्यावसायिक स्वरूपात कपडे धुण्याची सुविधा देणारे अनेक लॉंड्री व्यावसायिक उपलब्ध आहेत. जर स्थानिक पातळीवरच हे काम करून घेतले, तर सध्याच्या वाहतूक खर्चाच्या तुलनेत अगदी निम्म्याहून कमी खर्चात हे काम होऊ शकते. असे असताना एकाच बाहेरील खासगी कंपनीला संपूर्ण कंत्राट देण्याचा आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास घडवण्याचा अट्टाहास का धरला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
आरोग्य विभागाची भूमिका:
-
या संपूर्ण प्रकरणाबाबत विचारणा केली असता, शासकीय रुग्णालयांकडील कपडे धुण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीकडे देण्यात आले असून संबंधित कंपनी बाहेरील जिल्ह्यातील प्रकल्पातून कपडे धुऊन आणत असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, संबंधित कंपनीला कोल्हापुरातच स्थानिक पातळीवर कपडे धुलाईचा प्रकल्प सुरू करण्याच्या सक्त सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, शासकीय निधीचा असा होणारा अपव्यय रोखण्यासाठी यावर ठोस व तात्काळ कारवाईची गरज असल्याचे बोलले जात आहे.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



