पुणे: शिक्षण विभागाचा दणका ५३ अनधिकृत शाळा, १४ शाळांना कुलूप तर ९ जणांवर गुन्हे दाखल

पुणे: राज्यभरात सुरू असलेल्या अनधिकृत शाळांच्या सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यात तब्बल ५२६ शाळा विनापरवाना (अनधिकृत) सुरू असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये पुणे विभागातील ५३ शाळांचा समावेश असून, शिक्षण विभागाने यापैकी १४ शाळा तातडीने बंद केल्या आहेत. तसेच, गंभीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ शाळांविरोधात पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल केला असून, उर्वरित ३१ शाळांना नोटीस बजावण्यात आली आहे.

घटनेचा सविस्तर तपशील:
कोणतीही शाळा सुरू करण्यासाठी शासनाची अधिकृत मान्यता आणि 'यू-डायस' (U-DISE) क्रमांक असणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. मात्र, नियमांना धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी अनधिकृत शाळा सुरू असल्याचे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, ही माहिती समोर आली आहे.

 

राज्यात सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबई विभागात (४५२) आहेत. या तुलनेत पुणे विभागातील ५३ शाळांची संख्या मोठी असली, तरी शिक्षण विभागाने या शाळांविरोधात कठोर पवित्रा घेतला आहे. नागपूर विभागात ११ पैकी ५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर नाशिक, अमरावती आणि संभाजीनगर विभागातही कारवाईचा धडाका सुरू आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूर आणि लातूर विभागात एकही अनधिकृत शाळा आढळलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांच्या शाळेची अधिकृत मान्यता आधी तपासून घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *